मुख्य बातम्या

अजित पवार शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढणार…

शिरुर (तेजस फडके) बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचे संकेत देणारे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने त्या दृष्टीने अजित पवार यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार अशी होण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांनी बारामती विधानसभेची जागा न लढण्याचे संकेत बारामती येथील मेळाव्यात दिले होते. ‘मी उमेदवार देईन, त्यालाच निवडून द्या,’ असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले होते. त्यामुळे बारामतीचा उमेदवार कोण असेल, याचबरोबर अजित पवार कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. अजित पवार यांनी शिरूर मतदार संघामधून निवडणूक लढविल्यास अजित पवार विरुद्ध अशोक पवार अशी निवडणूक रंगेल. अजित पवार यांनी शिरूर मधून निवडणकू लढवावी. शिरूर तालुक्याला अजित पवार यांच्या सारखा आमदार मिळाल्यास विकास होऊ शकेल, अशी चर्चा एका बाजुला सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. हा पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी, त्यांनी ‘बारामतीमधून निवडणूक लढविण्यात आता रस राहिलेला नाही,’ असे विधान करतानाच, ‘कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि संसदीय समितीने मान्यता दिली तर, जय पवार यांना बारामतीमधून उमेदवारी दिली जाईल,’ असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, ‘बारामती हा अजित पवार यांचा डीएनए आहे. ते बारामतीमधूनच लढतील,’ असे स्पष्ट केले होते.

शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अशोक पवार विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्या समवेत राहण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिरूरमध्ये झालेल्या मेळाव्यात त्यावरून अजित पवार यांनी विद्यमान खासदार आणि आमदारांना आव्हान दिले होते. ‘मंत्रिपद तर लांबच, आमदारच कसे होतो ते मी पाहतोच,’ असा इशारा अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास अशोक पवार यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.

अजित पवार जिल्ह्याचे तसेच राज्याचे प्रमुख नेते आहेत. त्यांना राज्यातील प्रत्येक मतदारसंघाची जाण आणि खडान् खडा माहिती आहे. ते केवळ बारामती किंवा शिरूरमधूनच नव्हे, तर राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी होऊ शकतात.
– प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या विशेषांकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन!

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

‘ती’ बातमी निराधार आणि खोडसाळ : दिलीप वळसे-पाटील

दिलीप वळसे पाटील अन् देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची…

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

11 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago