आरोग्य

गूळ हा साखरेला खरंच पर्याय ठरु शकतो का? पाहा फायदे…

मधुमेह, शुगर, साखर हे शब्द हल्ली आपण सारखेच ऐकतो. कारण घरोघरी अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला मधुमेह असल्याचे पाहायला मिळते. मधुमेह म्हटला की पहिली साखर कमी केली जाते. साखरेचा चहा, गोडाचे पदार्थ या सगळ्यावर बंधने येतात. मग साखर नको तर साखरेला पर्याय असलेला खजूर, मध, गूळ यांसारखे घटक वापरुन तयार झालेले गोडाचे पदार्थ खाल्ले जातात. इतकेच काय तर बरेच जण मधुमेह झाल्यावर किंवा झाला नसला तरीही गुळाचा चहा पितात. शिरा, खीर यांमध्येही हे लोक आवर्जून गुळाचा वापर करतात. असं केल्याने खरंच रक्तातील साखर वाढण्यावर नियंत्रण येतं का, गूळ हा साखरेला खरंच पर्याय ठरु शकतो का?…

साखर ही जशी मधुमेहासाठी किंवा सामान्यांसाठीही चांगली नाही त्याचप्रमाणे गुळामध्ये तितक्याच कॅलरीज असतात की कमी असतात हे आपण समजून घ्यायला हवं. मधुमेह ही जीवनशैलीविषयक समस्या असून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की आरोग्याच्या इतरही तक्रारी सुरू होतात. ही गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत जाते आणि मग परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आपण काहीच करु शकत नाही. त्यापेक्षा आधीपासूनच आहाराबाबत योग्य ती काळजी घेणं केव्हाही चांगले. पाहूयात साखर नको म्हणून गूळ खाण्यात कितपत तथ्य आहे..

१. साखरेवर खूप जास्त प्रक्रिया झाल्याने ती आरोग्यासाठी चांगली नसते हे बरोबर आहे.

२. गुळावर तुलनेने कमी प्रक्रिया होते त्यामुळे गुळात खनिजे, जीवनसत्त्वे, लोह आणि अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण जास्त असते.

३. मात्र पोषक तत्त्व असल्याने गूळ आरोग्यासाठी चांगला आहे असे म्हटले तरी त्यातही साखरे इतक्याच कॅलरीज असतात. त्यामुळे कॅलरीजची तुलना केली तर गूळ आणि साखर सारखेच असतात.

४. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटक असतात त्याप्रमाणे रिफाईंड शुगरमध्ये म्हणजेच आपण वापरत असलेल्या साखरेत पोषक घटक अजिबात नसतात.

५. पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासाठी गूळ उपयुक्त ठरतो, तर शरीरातील अनावश्यक घटक बाहेर काढण्यासाठीही गुळातील अँटीऑक्सिडंटस फायदेशीर असतात.

६. वजन कमी करण्यासाठी किंवा मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी साखर बंद करत असाल तर गुळही बंद करायला हवा कारण दोन्हीतून शरीराला तितक्याच कॅलरीज मिळतात.

कॅल्शियमचा खजिना आहेत तीळ; खाण्याची योग्य पद्धत घ्या जाणून…

झोपण्यापूर्वी 30 मिनिटे चालल्यामुळे काय होतं? पाहा फायदे…

महत्त्वाच्या टिप्स! जेवण करताना पाणी प्यायल्याने काय होतं…

कारले जरूर खा; पाहा आरोग्यासाठी किती फायदे…

दातांना पिवळेपणा आला आहे का? पाहा नैसर्गिक उपाय…

लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्…

एक महिना चहा सोडा आणि पाहा किती फायदे…

पावसाळ्यातील आहार कसा असावा? काय खावे, काय टाळावे, घ्या जाणून…

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

3 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

5 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago