‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

मुख्य बातम्या राजकीय

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत असुन आज (दि 8) रोजी दुपारी शिरुर आणि त्यानंतर न्हावरे येथील सभेत त्यांनी शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यावर सडकून टिका केली. तसेच घोडगंगा साखर कारखाना बंद पाडायला मला काय वेड लागलंय का…? असं म्हणतं ‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’ असं अशोक पवारांना खुलं आव्हान दिलं आहे.

 

शिरुर येथील पाच कंदील चौकात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जयंत पाटील, रोहित पवार आणि स्वतः अशोक पवार यांनी घोडगंगा कारखाना बंद पाडण्याला अजित पवारच जबाबदार असल्याच विधान केलं होत. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, घोडगंगा कारखाना बंद पाडायला मला काय वेड लागलंय का…? अशोक पवारांचा स्वतःचा वेंकटेश कृपा कारखाना कसा व्यवस्थित चालतोय मग घोडगंगाच का बंद पडला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

तसेच कारखान्याच्या निवडणुकीत मी स्वतः तुमच्या पॅनलच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. तुमच्या विजयात आमचा पण खारीचा वाटा आहे. तुला शरद पवार यांनी मंत्रीपदाच गाजर दाखवलयं. त्यामुळे त्याने कारखान्याची पण वाट लावली आणि सगळ्यांचीच वाट लावली. अन निघालाय मंत्री व्हायला पण तु आमदारच कसा होतोय तेच मी बघतो असं म्हणतं मी मी म्हणणाऱ्या अजित पवाराने आमदार होऊ दिलं नाही असं म्हणतं अजित पवारांनी अशोक पवार यांना न्हावरे (ता. शिरुर) येथील प्रचार सभेत खुलं आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता अशोक पवार यांच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

अजित पवारांचा शब्द खरा ठरणार…? 

यापुर्वीही अजित पवारांनी पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांना खुलं आव्हान देत ‘विजय शिवतारे मी बघतोच यंदा तु कसा आमदार होतो ते’ असं वक्तव्य करत विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव करत बोललेला शब्द खरा करुन दाखवला होता. त्यामुळे अजित पवारांनी पुन्हा एकदा शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना ‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’ असं खुलं आव्हान दिल असुन शिरुर-हवेलीमध्ये पुरंदरचीच पुनरावृत्ती होणार का…? हे येणारा काळचं ठरवेल.

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार