मुख्य बातम्या

शिरुर; माझ्या मुलाचा एवढा काय गुन्हा होता…? त्यांनी एवढं निर्दयीपणे त्याला का मारलं…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर व श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील १९ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचे शिर व हात पाय सापडल्यानंतर त्याच्या कानात काळी बाळी असल्यामुळे हा मृतदेह माऊली सतीश गव्हाणे याचाच असल्याचे आज निष्पन्न झाले आहे.

 

हा मृतदेह पाहुन गव्हाणे कुटुंबांनी एकच आक्रोश केल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. एवढा काय गुन्हा केला एवढ्या निर्दयपणे आमच्या बाळाला माऊलीला मारले असे म्हणत कुटुंबाने आक्रोश करत अश्रूला वाट मोकळी करून दिली.

 

आज शनिवार (दि १५) रोजी सकाळी बाजुलाच जवळच असणाऱ्या एका विहिरीमध्ये पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत एक गाठोडे सापडले. ते उघडल्यानंतर गाठोड्यामध्ये दगडही टाकलेले आढळून आले. पोलिसांनी याची तपासणी केली असता गाठोड्या मधून दोन हात, पाय व शीर (डोके) सापडले आहे.

 

गेली चार दिवसांपासून हा धड असलेला मृतदेह नक्की कोणाचा आहे…? यासाठी पोलीस प्रशासन तपास करत असताना दाणेवाडी येथील दुसऱ्या विहिरीमध्ये आज हे गाठोडे सापडले. त्यामुळे या खुनाचे गुड वाढत चालले असून एवढ्या निष्क्रिय आणि निर्दयीपणे खून करणारे नक्की कोण आहेत …? हे आजही गुलदस्त्यात आहे. यामध्ये तरुणाचे शीर हात पाय हे अवयव सापडले आहेत.

 

पुणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे दोन दिवसापूर्वी एका विहिरीत हात पाय आणि शीर कट केलेले अवस्थेतील एक धड आढळून आलं होतं यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसुन तपास करत दाणेवाडी गावातून मिसिंग झालेला १९ वर्षांचा माऊली गव्हाणेच आहे का…? या अनुषंगाने तपास सुरू केला होता, माऊली गव्हाणे हा ७ मार्चला शिरूर येथे बारावीच्या पेपर साठी आल्यानंतर बेपत्ता झाला होता.

 

त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला होता. अखेर या दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये आढळलेले शीर आणि धड याची ओळख पटली असून माऊली गव्हाणे या १९ वर्षीय तरुणाचाच हा मृतदेह असून माऊलीची एवढ्या कृर निरघृपने हत्या कोणी केली. या घटनेचा तपास आता पोलीस करत असून या धक्कादायक घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अठरा वर्षाच्या युवकाची हातपाय कट करून अमानुष पणे हत्या केली जाते हे अतिशय धक्कादायक आहे.

 

ज्यांनी हा खून केला आहे हा खून मोठ्या शिताफिने व डोक्याने केला असल्याचे दिसून आले आहे. मृतदेह व त्याचे हात पाय हे अत्याधुनिक कटरने कापून धड व इतर अवयव वेगवेगळ्या पोत्यात भरून वेगवेगळ्या विहिरीत व दाणेवाडी याच गावात टाकले आहे. तर ज्या पद्धतीने हा खून केला व गावातील तरुणाचा हा मृतदेह असताना त्याच गावात असलेल्या विहिरीमध्ये मृतदेहाची विल्हेवाट लावणे हे धाडसी काम आहे.

 

या खुनातील गुन्ह्याचे आरोपींचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी दानेवाडी ग्रामस्थ व मृत माऊली गव्हाणे याच्या कुटुंबाने केली आहे.

शिरुरसह श्रीगोंदा तालुका हादरला.शिरुर-श्रीगोंदा शिवेवर तरुणाचा निर्घुण खून

रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

6 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

6 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

6 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

6 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

7 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

12 तास ago