आरोग्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा असेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल तरच प्रलंबित कामे पूर्ण होतील. यामुळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थकवा येऊ शकतो आणि डोकेदुखी, ताप येऊ शकतो त्यामुळे आज तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज इच्छा नसताना तुम्हाला खर्च करावा लागेल त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. पण जर तुम्ही आधीच बजेट बनवाल तर तुम्ही आर्थिक अडचणी टाळू शकता.

वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा असेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमच्या पालकांचा आशीर्वाद घेऊन तसेच तुमच्या भावंडांच्या सल्ल्यानेच पुढे जा. आज जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने एखादे काम केले तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद वाटेल. तुमच्या सभोवतालचे वातावरण आज आनंददायी असेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरण्यात घालवाल.

मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. नोकरीशी संबंधित लोकांना आज कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची आवश्यकता असेल तरच ते काम तुम्ही पूर्ण करू शकाल. छोट्या व्यावसायिकांना आज पैशांची कमतरता भासू शकल्याने चांगल्या ऑफर्सही हातातून निसटतील. आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी तुम्हाला सावध राहावे लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकाच्या घरी त्यांना भेटायला जाऊ शकता.

कर्क: आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. आज, जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर खूप काळजीपूर्वक जा, कारण तुमचा एखाद्या मित्राशी वाद होण्याची शक्यता आहे. असे झाले तर तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावा लागेल. आज तुमच्या मुलाला एखाद्या कोर्समध्ये ऍडमिशन मिळाल्याने तुम्हाला बरे वाटेल. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्यांचा निकाल आज येऊ शकतो.

सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम देणारा असेल. मात्र आज वडिलांनी दिलेला सल्ला त्यांच्यावर विश्वास ठेवून ऐकलं तर त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायातील अनेक समस्या सोडवू शकाल.आज तुमचे दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह लग्न, नामकरण समारंभ इत्यादी कार्यक्रमांमध्ये जाऊ शकता

कन्या: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. जर तुमच्या विरोधात कोर्टात मालमत्तेशी संबंधित केस सुरू असेल तर आज निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. तुम्ही आज एक छोटी पार्टी देखील आयोजित करू शकता. मात्र आज तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत निष्काळजी राहिल्यास तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल आणि तुमचे वरिष्ठ देखील खुश राहतील.

तूळ: आज वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल अन्यथा अपघात होऊ शकतो त्यामुळे ड्रायव्हिंग करताना अजिबात निष्काळजी राहू नका. जर तुमचा तुमच्या भावंडांसोबत वाद झाला असेल तर आज तोही संपेल आणि तुम्ही एकमेकांना एखाद्या गोष्टीत मदत सुद्धा कराल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज चांगली संधी मिळू शकते ज्यामुळे त्यांचे सार्वजनिक समर्थन देखील वाढेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यात वेळ घालवाल.

वृश्चिक: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात आज बाळाची गुड न्यूज येऊ शकते ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांकडून बोलणी ऐकावी लागू शकतात त्यामुळे तुम्हाला तुमचे काम काळजीपूर्वक करावे लागेल. जर तुम्ही शेअर बाजार इत्यादीमध्ये कोणतीही गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला दुप्पट रक्कम मिळू शकते त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. मात्र सासरच्या लोकांशी व्यवहार करण्यापूर्वी काळजी घ्यावी लागेल.

धनु: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. जर तुम्हाला जमीन, वाहन, घर खरेदी करायचे असेल तर ते स्वप्न आज पूर्ण होऊ शकते. त्यासाठी दिवस चांगला असेल. कुटुंबात कलह सुरु असेल तर तो आज संपेल, ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल. नोकरदार लोकांना विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यात घालवाल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची गरज भासते

मकर: आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय व्यस्त असल्याने तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. त्यामुळे तुमची आई आज तुमच्यावर नाराज होऊ शकते. संध्याकाळी वायरल आजार तुम्हाला ग्रासू शकतात त्यामुळे सावध राहावे लागेल. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. नोकरदार लोकांना आज मैत्रिणीच्या मदतीने पगारवाढीसारखी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून आनंदी व्हाल तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल.

कुंभ: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस कठीण असेल. आज अभ्यासात प्रश्न पडतील त्यामुळे त्यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची आवश्यकता त्यांना लागेल. आज तुमच्या आजूबाजूला कोणताही वाद निर्माण झाला तर तुम्ही त्यात अडकणे टाळावे अन्यथा ते प्रकरण कायदेशीर बनू शकते. आज कोणाला काहीही बोलण्याआधी कोणाला वाईट वाटणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. सासरच्यांसोबत वाद होत असतील तर आज तेही तुमच्या जोडीदाराच्या मदतीने सोडवले जातील.

मीन: आजच्या दिवशी तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती मिळेल. नोकरीतील एखाद्या सहकाऱ्याकडून जर आज तुमचे नुकसान झाले तर तुम्ही त्याच्यावर न चिडता त्याला माफ कराल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्वाकांक्षा पूर्ण कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी घाई करू नका अन्यथा तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करावा लागू शकतो. आज जोडीदारासोबत वाद झाला असेल तर तो आजच सोडवावा लागेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

6 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

6 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

6 तास ago

महिला आरक्षण विधेयकावरून देशात राजकीय गदारोळ

मुंबई: महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका…

7 तास ago

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…

9 तास ago

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…

9 तास ago