मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील त्या पोलीस चौकीवर मद्यपीकडून दगडफेक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे औट पोस्ट असलेल्या पाबळ पोलीस चौकीवर मद्यपी व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाळासाहेब काशिनाथ साकोरे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे औट पोस्ट असलेल्या पाबळ पोलीस चौकी येथे पोलीस कर्मचारी काम करत असताना एक मद्यपी व्यक्ती मोठमोठ्याने आरडाओरडा करत पोलीस चौकीच्या आवारात आला. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला समजावून सांगत असताना त्याने मोठ्याने आरडाओरडा करत शांततेचा भंग करत पोलीस चौकीच्या भिंतींवर दगडफेक केली.

दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस हवालदार गणेश गुलाबराव सुतार रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी बाळासाहेब काशिनाथ साकोरे (वय ५०) रा. महादेववाडी केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सुतार करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

11 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

17 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

18 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

18 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

18 तास ago