शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात कंपनीत जाणाऱ्या कामगारांचे हातपाय बांधून लुटले…

रात्रीत दोन कामगारांना लुटल्याने कामगार भयभीत

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवरून रात्रीच्या सुमारास कंपनीत जाणाऱ्या कामगाराला मारहाण करत त्याचे हातपाय बांधून दुचाकी मोबाईल सह आदी वस्तू लुटून अजूनही एका कामगाराला मारहाण करत लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वाजेवाडी (ता. शिरुर) येथील कोरेगाव भीमा चौफुला रोडवरून रात्रीच्या सुमारास संकल्प फिर्जींग कंपनीचा कामगार हरिष जगताप हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ एम एस ९७१५ या दुचाकीहून येत असताना 3 अज्ञात युवकांनी त्याला अडवून शिवीगाळ, दमदाटी करत शेजारील शेतात घेऊन जात त्याचे कपडे काढून त्याच्यात कपड्याने त्याचे हातपाय बांधून ठेवत त्याच्या जवळील मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड काढून घेत मोबाईल वरुन ऑनलाईन रक्कम पाठवण्याचा पासवर्ड विचारून रक्कम पाठवली. मात्र रक्कम सेंड न झाल्याने त्याच्या एटीएमचा पासवर्ड विचारून घेत त्याचीची दुचाकी घेऊन तिघेजण गेले.

मात्र पुन्हा सदर इसमांनी त्या रस्त्याने येणाऱ्या वढू बुद्रुक येथील संकेत नामदेव भंडारी या युवकाला देखील मारहाण करत त्याच्याजवळील रक्कम व मोबाईल चोरुन नेला. मात्र हरिष जगताप या कामगाराला शेतातच दमदाटी करत हातपाय बांधून ठेवून तिघेजण निघून गेले.  त्यावेळी हरिष याने स्वतःची सुटका करुन घेत जवळ असलेल्या एका घराकडे जात घडलेला प्रकार त्यांना सांगत पोलीस स्टेशन गाठले.

याबाबत हरिष पुंडलिक जगताप (वय ३४) रा. राम नगर पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस शिपाई निरज पिसाळ हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

4 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

10 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

11 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago