मुख्य बातम्या

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरूरमध्ये तीव्र निषेध; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शिरूर शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील विविध सामाजिक, राजकीय व मराठा संघटनांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन सादर केले. या घटनेतील हल्लेखोर अद्याप मोकाट असून, त्यांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंड, तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, माजी उपसरपंच संभाजी कर्डिले, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, संभाजी ब्रिगेडचे सुदाम कोलते, सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले, रूपाली बोर्डे, राधा घेगडे, सकल मराठा समाज संघाचे विश्वस्त रामभाऊ इंगळे, प्रा. चंद्रकांत धापटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, काँग्रेस (आय) चे अजीम सय्यद, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मोहम्मद हुसेन पटेल, बबनराव गायकवाड आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी रवींद्र धनक यांनी भाषणात सांगितले की, “प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून, अशा घटनांनी महाराष्ट्रातील विचारमंथनाची परंपरा डागळते. दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे.”

पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे, मंगेश खांडरे, विनोद भालेराव, राणी कर्डिले, संजय बारवकर, भास्कर पुंड आदींनी आपले विचार मांडत, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शासनाने गंभीर भूमिका घेतली पाहिजे, अशी जोरदार भूमिका मांडली.

निवेदनात म्हटले आहे की, “विचारांची लढाई ही विचारांनीच व्हायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीतून सामाजिक परिवर्तन घडवले गेले आहे. अशा विचारवंतांवर हात उचलणे ही समाजविघातक प्रवृत्ती असून ती अजिबात सहन केली जाणार नाही.”निवेदनाच्या अखेरीस असेही नमूद करण्यात आले की, हल्ल्याचा सूत्रधार अद्याप मोकाट फिरत आहे, हे शासनाचे अपयश दर्शवते. त्यामुळे अशा असहिष्णु प्रवृत्तींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करून प्रवीण गायकवाड यांना न्याय द्यावा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

28 मिनिटे ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

14 तास ago