मुख्य बातम्या

पुणे नगर महामार्गावर एस टी व क्रेनचा भीषण अपघात

सणसवाडी नजीक कल्याणी फाट्यावर अपघातात बारा प्रवाशी जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) नजीक पुणे नगर महामार्गावर कल्याणी चौक येथे एस टी व क्रेनचा भीषण अपघात होऊन झालेल्या अपघातात तब्बल 12 प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन एम एच १४ बी टी २८०० हि एस टी बस अहमदनगर बाजूने पुणे बाजूकडे जात असताना कल्याणी चौकातून एसटी च्या पुढे जात असलेला एम एच १२ टी वाय ४५०२ या क्रेन चालकाने अचानक क्रेन रस्त्यावरुन अचानकपणे उजव्या बाजूकडे वळवला. दरम्यान अहमदनगर बाजूकडून आलेल्या एसटीची क्रेनला धडक बसून अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस हवालदार राजेश माने, पोलीस नाईक राकेश मळेकर, महेंद्र पाटील, पोलीस मित्र खंडेराव चकोर, बापू भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने कोरेगाव भीमा येथील खाजगी रुग्णालयात हलवले, तर यावेळी झालेल्या अपघातात सारिका अजित फुले रा. सुस रोड पुणे, सुमन सुर्यकांत भोसले व जयंत सुर्यकांत भोसले दोघे रा. कात्रज पुणे, राहुल दत्तात्रय काफे रा. कोपरगाव अहमदनगर, अरमान अमरफारु खान रा. शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे, निर्मला शिवाजी हापसे व शिवाजी देवराव हापसे दोघे रा. राहुरी अहमदनगर, अश्विनी विशाल आवारे व विशाल सखाराम आवारे दोघे रा. निंबूडी अहमदनगर, शोभा भारत हिवाळे रा. नाशिक, वीरेंद्र दिनकर बनसोडे रा. वाटेगाव, शिवाजी अनिल दाभाडे रा. शिरुर पुणे हे सर्व बारा प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.

घडलेल्या घटनेबाबत एस टी चालक विरेद्र दिनकर बनसोडे (वय ४७) रा. वाडेगाव ता. वाळवा जि. सांगली यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून शिक्रापूर पोलिसांनी सुरजकुमार अशोक कुमार रा. कुंजहित आजमगड देवगड उत्तरप्रदेश याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने व पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

11 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

11 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

14 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

14 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

15 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

15 तास ago