क्राईम

कोरेगाव भीमात किरकोळ वादातून फायटर व काठीने हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ एकमेकाकडे पाहिले म्हणून दोघा युवकांमध्ये वाद होऊन फायटर व काठीने हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अक्षय नानाभाऊ गव्हाणे व अनिल नारायण गव्हाणे या दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील डिंग्रजवाडी फाट्या जवळून अक्षय गव्हाणे हा चालेलला असताना अनिल गव्हाणे शेजारुन जात असताना अक्षयने त्याच्याकडे पहिल्याने अनिल याने तू माझ्याकडे का पहिले, असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत लोखंडी फायटरने अक्षयच्या डोक्यात व तोंडावर मारहाण केली. यावेळी अक्षय याने देखील प्रतिकार करत काठीने अनिल याला मारहाण केल्याची घटना घडली.

याबाबत अक्षय नानाभाऊ गव्हाणे व अनिल नानाभाऊ गव्हाणे दोघे रा. डिंग्रजवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोघांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago