मुख्य बातम्या

शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम; राष्ट्रवादीच्या तृप्ती सरोदे मात्र ‘प्रचारात’ आघाडीवर

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ऐन थंडीतही राजकीय वातावरण तापू लागले असले, तरी अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाही. भाजप, काँग्रेस तसेच दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेकडून सध्या फक्त ‘चाचपणी’ सुरु असून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होत असली, तरी उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम आहे.

मात्र या अनिश्चिततेच्या वातावरणात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन इच्छुक असलेल्या तृप्ती अजय सरोदे यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासुनच प्रत्यक्ष मैदानात उतरुन आघाडी घेतली आहे. उमेदवारी जाहीर नसतानाही त्यांनी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीवर थेट संपर्क साधत वातावरण निर्मिती केली आहे.

तृप्ती सरोदे यांचा संपर्क दौरा केवळ औपचारिक भेटीपुरता मर्यादित न राहता, स्थानिक प्रश्न, ग्रामस्थांच्या अडचणी, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि तरुणांच्या अपेक्षा यावर केंद्रित असल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांनी “उमेदवारी जाहीर होईल की नाही हा प्रश्न नंतरचा आहे, मात्र जनतेशी नाते जोडणे हे प्राथमिक काम आहे,” अशी भुमिका घेतल्याची चर्चा आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, इतर पक्ष उमेदवार ठरविण्याच्या गणितात अडकले असताना ‘तृप्ती सरोदे’ यांनी प्रत्यक्ष मतदारांना भेटुन स्वतःची ओळख मतदारांमध्ये निर्माण केली आहे. याचा थेट फायदा उमेदवारी जाहीर झाल्यास राष्ट्रवादीला होऊ शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील महिलावर्ग, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, शिरुर ग्रामीण–न्हावरे गटात इतर पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी असली तरी अजुन अधिकृतपणे कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. परंतु त्या आधीच तृप्ती सरोदे या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील विविध कार्यक्रमाला हजेरी लावत असल्यामुळे लोकांना त्या परिचित झाल्या आहेत. त्यामुळे सरोदे यांची वाढती लोकप्रियता हि इतर पक्षांसाठीही चिंतेचा विषय ठरत आहे.

आता प्रश्न हा आहे की, उमेदवारीची अधिकृत घोषणा कधी होणार…? आणि उमेदवार जाहीर होईपर्यंत तृप्ती सरोदे यांचा हा संपर्क दौरा राष्ट्रवादीच्या बाजूने किती मोठे वातावरण निर्माण करणार…?हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले, तरी शिरुर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात सध्या ‘अधिकृत घोषणा नाही, पण तयारी जोरात’ हेच चित्र दिसून येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

7 मिनिटे ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

1 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

14 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

14 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

14 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

15 तास ago