महाराष्ट्र

अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न; मोदींनी जाहीर माफी मागावी

मुंबई: सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्या गझनीच्या महमूदप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाने वाराणसीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवून इतिहास पुसण्याचे घोर पाप केले आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले की, अहिल्यादेवींच्या ३०० व्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत एकीकडे भाजप सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे त्यांच्या स्मृतींचेच उच्चाटन केले जात आहे. हा भाजपाचा दुटप्पीपणा असून हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाचा खरा चेहरा उघडा पडला आहे.

नरेंद्र मोदींच्या अंगात गझनीचे भूत शिरले असून अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही. या प्रकाराविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.

धनगर समाजाचा अपमान; २७ तारखेपर्यंत माफी नाही तर आंदोलन – यशपाल भिंगे

यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे म्हणाले की, १७७१ मध्ये अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर १० जानेवारी रोजी बुलडोझर चालवण्यात आला व त्यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. हा प्रकार धनगर समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणारा आहे. नरेंद्र मोदींनी २७ जानेवारीपर्यंत जाहीर माफी मागावी, अन्यथा भाजपाच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते यावर मौन का बाळगून आहेत, असा सवालही भिंगे यांनी उपस्थित केला.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणनिती ठरली

काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रणनितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महानगरपालिका व नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकांतही समविचारी पक्षांशी आघाडी केली जाईल, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ चिन्ह) सोबत आघाडी होणार नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीसोबतची युती ही केवळ आकड्यांची नव्हे तर वैचारिक असल्याचे सांगत, त्यावर होणारी टीका एकांगी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

13 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago