मुख्य बातम्या

शिंदोडीत डाळिंबाच्या बागेवर चोरट्यांचा डल्ला; ८० हजारांच्या डाळिबांची चोरी

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या बागेतून अज्ञात चोरट्याने तब्बल ८०० किलो ‘सुपर भगवा’ जातीची डाळिंबे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीला गेलेल्या डाळिंबांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असून, या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजाराम भानुदास ओव्हाळ (वय ४२, रा. शिंदोडी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हाळ यांची शिंदोडी गावच्या हद्दीतील गट क्रमांक १०६/२ मध्ये डाळिंबाची बाग आहे. या बागेत त्यांनी ‘सुपर भगवा’ जातीच्या डाळिंबाचे उत्पादन घेतले होते. १३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी 8:30 वाजल्यापासून ते १४ जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने बागेत प्रवेश केला. चोरट्याने बागेतील सुमारे ८०० किलो डाळिंबे तोडून चोरुन नेली.

बाजारभावानुसार प्रतिकिलो १०० रुपये दराने चोरीला गेलेल्या डाळिंबांची एकूण किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळी बागेत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात डाळिंबे गायब असल्याचे ओव्हाळ यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मालाचा अथवा चोरट्याचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने त्यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद मोरे हे करीत असुन, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याचा शोध सुरु आहे.

शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…

शेतमालाला चांगला बाजारभाव मिळत असताना डाळिंबाच्या बागेतून थेट तयार माल चोरीला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अनेक महिने मेहनत घेऊन तयार केलेला शेतमाल एका रात्रीत चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात शेतमाल चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.

वर्षभरापुर्वीच्या चोरीचा अजुनही तपास नाही…

शिंदोडीत यापुर्वीही एक वर्षभरापुर्वी शहाजी वाळुंज यांच्या शेतातुन डाळिंबाची चोरी झाली होती. परंतु वर्ष उलटूनही या चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत रोहित्रातील तांब्याच्या कॉईल चोरी, ऑईल चोरी तसेच डाळिंब चोऱ्यांचे प्रमाण वाढले असताना पोलिस नक्की काय करत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

4 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

10 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

11 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago