महाराष्ट्र

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : ‘सेफ फूड – सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी कारवाई करत तब्बल ₹2.93 कोटी किमतीचा संशयित खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे रिपॅकिंग केल्याचे आढळून आल्यानंतर बागारिया ॲग्रो प्रॉडक्ट्स (पैठण) आणि बागारिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रा. लि. (छत्रपती संभाजीनगर) या दोन कंपन्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

FDA च्या तपासणीत वापरलेल्या जुन्या टिनच्या डब्यांमध्ये पुन्हा खाद्यतेल भरले जात असल्याचे उघड झाले. उत्पादन विभागात धूळ, गंज, कोळीष्टके आणि घाणीचे थर साचलेले होते. दुर्गंधीयुक्त तेलाचे टब उघड्यावर ठेवण्यात आले होते. बंद रिफायनरी आणि सुरू असलेला रिपॅकिंग विभाग एकाच ठिकाणी असल्याने क्रॉस-कंटॅमिनेशनचा गंभीर धोका निर्माण झाल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

तपासात कारखान्यात स्वतःची प्रयोगशाळा नसणे, तेलाच्या गुणवत्तेचे विश्लेषण अहवाल उपलब्ध नसणे, तांत्रिक अधिकाऱ्याची नियुक्ती न करणे, साठवणूक टाक्या व पाइपलाइनवर आवश्यक लेबल नसणे तसेच पॅकेजिंगसाठी फूड-ग्रेड प्रमाणपत्राचा अभाव अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.

FDA ने जप्त केलेल्या खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, नागरिकांनी खाद्यतेल खरेदी करताना FSSAI परवाना क्रमांक, उत्पादन तारीख, पॅकेजवरील सील यांची खातरजमा करूनच खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

7 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

13 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

13 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

14 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

14 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

14 तास ago