मुख्य बातम्या

MEPL च्या विरोधात ‘निमगाव भोगी’ सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे दोन दिवस धरणे आंदोलन

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथील औद्योगिक वसाहती मधील महाराष्ट्र एंव्हायरो पावर लिमिटेड (MEPL) या कंपनीसमोर आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी निमगाव भोगी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दोन दिवस धरणे आंदोलन केले. यावेळी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या वतीने आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गुरुवार (दि १०) ऑक्टोबर रोजी भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाची सांगता केली. तर आज शुक्रवार (दि ११) ऑक्टोबर रोजी निमगाव भोगी, सरदवाडी, कर्डेलवाडी आमदाबाद तसेच परिसरातील ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले व महिला भगिनींसह दिवसभर कंपनीच्या गेट समोर भजन गाऊन आगळे वेगळे आंदोलन केले. यावेळी ‘MEPL कंपनी हटाव गाव बचाव’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, निमगाव भोगीच्या सरपंच उज्वला अंकुश इचके, उपसरपंच विकास रासकर, माजी सरपंच सचिन सांबारे, लक्ष्मण सांबारे, डॉ संतोष शिंदे, आमदाबाद गावचे माजी सरपंच प्रकाश थोरात, आबा जाधव, नितीन थोरात, कर्डेलवाडीचे माजी सरपंच संतोष कर्डिले, गणेश कर्डिले, निमगाव भोगीच्या माजी सरपंच सुप्रिया पावशे, चांगदेव रासकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरुर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४ अल्पवयीन मुलीं, महीला व ६ बेपत्ता मुलींचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

शिरुर तालुक्यात नॉनव्हेज खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

12 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago