शिरुर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४ अल्पवयीन मुलीं, महीला व ६ बेपत्ता मुलींचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत महीनाभरात तब्बल ११ मुली व महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत याचा छडा लावुन मिसिंग झालेल्या चार अल्पवयीन मुलीं, तीन महीला व सहा मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले आहे. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे परीसरातुन कौतुक होत आहे.

शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत सप्टेंबर महिन्यामध्ये बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शिरुर पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले असल्याचे शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे. तर तीन महीला व सहा मुलींचा शोध घेऊन त्यांनाही त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले आहे.

 

शिरुर पोलीस स्टेशनच्या या कामगिरीबद्दल शिरुर शहर व तालुक्यातुन शिरुर पोलिसांचे कौतुक होत आहे . या कामगिरी बरोबरच बेवारस अज्ञात व्यक्तीच्या खुनाच्या गुन्हयाची उकल, रोडरोमिओ, विना नंबर प्लेट, ट्रिपल सिट, काळया काचा वापरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. तसेच पाच वर्षापासून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपीही पोलिसांनी गजाआड केला असुन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पदभार घेतल्यापासून दाखल झालेल्या गंभीर प्रकरणांचा छडा लावून आरोपी गजाआड गजाआड करण्यात ते यशस्वी झाले आहेत.

 

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक संदेश केंजळे यांच्या पोलीस पथकाने केली आहे.

शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच

शिंदोडी सारख्या छोट्या गावाला कोट्यावधींचा निधी देता आला याचा मनस्वी आनंद:- सुजाता पवार

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या