क्राईम

शिरूर तालुक्यात बनावट सोने विकणारी टोळी सक्रिय; पोलिसांचे काळजी घेण्याचे आवाहन…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात नकली सोने विकणारी व नकली सोने बँकेत ठेवून सोने तारण करणारी टोळी मोठया प्रमाणावर सक्रीय झाली आहे. पारनेर कनेक्शन असणाऱ्या या टोळीने शिरुर शहरासह शिरूर तालुक्यातील बेट भागात अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टाकळी हाजी येथील एका सोनाराकडे होलमार्क शिक्का असलेले नकली सोन्याचे कडे देवून आम्हास या बदल्यात दुसरे दागिने बनवायचे आहेत, असे सांगून गंडा घालण्याचा प्रयत्न झाला होता. सोनाराने ते सोन्याचे कडे तपासून पाहिले असता त्यावर होलमार्क शिक्का आढळून आला. परंतु, दोन तोळे वजन असलेल्या दागिन्यावर चोवीस कॅरेट सोन्याचे आवरण होते आणि आतमध्ये चांदीची रिंग आढळून आली.

प्रथमदर्शनी हा अलंकार पाहता आणि त्यावरील होलमार्क शिक्का पाहिल्यानंतर तो अलंकार बनावट असेल असे घाईघाई लक्षात येत नाही. त्यामुळे चालू दरापेक्षा कमी दरात सोने मिळत असल्याने अनेकांची फसवणूक झाली असावी, असा अंदाज सोनार व्यक्त करत आहेत. कांद्याला, ऊसाला चांगला भाव मिळाल्याने सोने खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. याचा गैरफायदा या टोळीने घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचे सोने बँकेत तसेच पतसंस्थामध्ये तारण करून पैसे घेतल्याची शंका मोठया प्रमाणावर उपस्थित होत आहे.

कमी दरात सोने मिळते या अमिषाला बळी न पडता पक्के बिल पाहून सोनाराकडून खात्री करूनच खरेदी करावी. बनावट सोने घेवून फसवणूक झाली असेल तर तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करावी.
– संदेश केंजळे, पोलिस निरीक्षक, शिरूर.

शिरुर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४ अल्पवयीन मुलीं, महीला व ६ बेपत्ता मुलींचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…

रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण

शिरूर! उसाच्या गरम रसात जाऊन पडला अन् पुढे फेकले नदीत…

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago