मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीतील दोन विद्यमान सदस्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असुन या घडामोडीमुळे गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे. यातील एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनल मधुन निवडणुक लढवलेली आहे.

रांजणगाव गणपतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षल गदादे, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदा खेडकर यांनी आज अनेक कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. तसेच निमगांव भोगीचे ग्रामपंचायत सदस्य दिपक राउत, घोडनदी बार एसोसिएशनचे सदस्य अ‍ॅड महेश रासकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

या प्रवेशामुळे रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपची ताकद वाढली असुन, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या राजकीय उलथापालथीमुळे गावच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

 

ग्रामपंचायतला आमच्या सोबत असणारे हर्षल गदादे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे समजले. परंतु त्या मागच कारण कळलेलं नाही. ते आमच्याच मित्र पक्षात गेलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अजुन काही दिवस बाकी आहेत. दरम्यानच्या काळात अनेक कार्यकर्त्यांचे इनकमिंग व आउटगोइंग चालू राहणार आहे. त्यामुळे आम्ही ‘वेट अँड वॉच’ ची भुमिका घेतली आहे.

मानसिंग पाचुंदकर पाटील 

तालुकाध्यक्ष:- आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघ 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

2 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

3 तास ago