रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीतील दोन विद्यमान सदस्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असुन या घडामोडीमुळे गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे. यातील एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनल मधुन निवडणुक लढवलेली आहे.
रांजणगाव गणपतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षल गदादे, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदा खेडकर यांनी आज अनेक कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. तसेच निमगांव भोगीचे ग्रामपंचायत सदस्य दिपक राउत, घोडनदी बार एसोसिएशनचे सदस्य अॅड महेश रासकर यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
या प्रवेशामुळे रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपची ताकद वाढली असुन, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या राजकीय उलथापालथीमुळे गावच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतला आमच्या सोबत असणारे हर्षल गदादे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे समजले. परंतु त्या मागच कारण कळलेलं नाही. ते आमच्याच मित्र पक्षात गेलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला अजुन काही दिवस बाकी आहेत. दरम्यानच्या काळात अनेक कार्यकर्त्यांचे इनकमिंग व आउटगोइंग चालू राहणार आहे. त्यामुळे आम्ही ‘वेट अँड वॉच’ ची भुमिका घेतली आहे.
मानसिंग पाचुंदकर पाटील
तालुकाध्यक्ष:- आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघ