मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत होत असल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. आंबळे येथील काजळे वस्तीवर घरासमोर फटाके वाजविण्यास मनाई केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांत तुफान मारहाण झाली. तर रांजणगाव सांडस येथे मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन एका तरुणाला लोखंडी रॉड आणि लाकडी स्टंपने मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये एकूण १६ जणांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

रांजणगाव सांडस येथे तरुणाला लोखंडी रॉड व स्टंपने मारहाण…

पहिली घटना १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रांजणगाव सांडस येथील जिल्हा परिषद शाळेजवळ घडली. राहुल सूर्यभान धनवट (वय २९, रा. खांडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हे त्यांचा मुलगा कार्तिक याच्यासोबत बोलत असताना रविंद्र राणू मोरे, विजय राणू मोरे व राणू मारुती मोरे यांनी त्यांना मुलासोबत बोलण्यास मज्जाव केला.

यातून झालेल्या वादानंतर रविंद्र मोरे याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या दोन्ही हातांच्या दंडावर मारहाण केली, तर विजय मोरे याने लाकडी स्टंपने डोक्यावर, हातांच्या दंडावर व छातीवर प्रहार करुन दुखापत केली. तसेच राणू मोरे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

आंबळे येथे फटाक्यांच्या कारणावरुन दोन कुटुंबांत संघर्ष…

दुसरी घटना ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास आंबळे येथील काजळेवस्तीवर घडली. फिर्यादी अक्षय हिरामण शिंदे यांच्या घरासमोर शेजारी राहणारा निलेश निघुल हा फटाके वाजवत होता. घरात लहान बाळ असल्याने फिर्यादी यांनी घरासमोर फटाके न वाजवता थोडे दूर जाऊन फटाके वाजविण्याची विनंती केली. मात्र, याच गोष्टीचा राग आल्याने निलेश निघुल याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

त्यानंतर निलेश निघुल याच्यासह कैलास निघुल, वैभव जाधव, अर्जुन जाधव, सचिन जाधव, रविंद्र मुरकुटे, निळकंठ मुरकुटे, सुनिल शिंदे, राजाराम जाधव, शिवानी निघुल, सुनिता जाधव, रेश्मा जाधव व सुमन मुरकुटे यांनी काठी व कुऱ्हाड हातात घेऊन फिर्यादी यांच्या घरासमोर जमाव केला. यावेळी फिर्यादी, त्यांचे आई-वडील, भाऊ व पत्नी यांना शिवीगाळ व दमदाटी करत हाताने, लाथाबुक्क्यांनी, काठीने तसेच कुऱ्हाडीने मारहाण करत दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली दूर…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : दिवाळी म्हटले की खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक…

5 दिवस ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 आठवडा ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 आठवडा ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 आठवडा ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

1 आठवडा ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

1 आठवडा ago