शिरुर (तेजस फडके) विसापुर-शिरुर एसटी बस वाहकाला देवदैठण (ता. श्रीगोंदा) येथे इको कार चालक व त्याच्या साथीदाराने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाहक संतोष बाळासाहेब थोपटे (वय ३६, रा. मोराची चिंचोली, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
सोमवार (दि १५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:०० च्या सुमारास एसटी बस क्रमांक एमएच १४ डीटी ४१४३ हि श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर गावावरुन शिरुरकडे जात होती. बसचे चालक कुडलिक गाडीलकर आणि वाहक संतोष थोपटे हे कर्तव्य बजावत असताना देवदैठण शिवारातुन जाताना पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातील पाणी इको कारवर उडाल्याने इको चालक संतापला. त्याने एसटी चालकाला शिवीगाळ करत “पुढे पाहतो” अशी धमकी दिली.
यानंतर देवदैठण गावाच्या पुढे शिरुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर इको कार (क्र. एमएच १६ डीजी ९१४५) बससमोर आडवी लावून काही जणांनी एसटी थांबवली. त्यानंतर कारचालकाने फोन करुन त्याच्या साथीदाराला बोलावून घेतले. लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला इसम सागर ससाणे हा बसमध्ये घुसला आणि वाहक थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
त्यानंतर बस चालक गाडीलकर व इतर प्रवाशांनी हस्तक्षेप करत हा प्रकार थांबवला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी संतोष थोपटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इको कार (क्रं एमएच १६ डीजी ९१४५) वरील चालक आणि सागर ससाणे यांच्याविरुद्ध शिरुर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…