मुख्य बातम्या

रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणात धाडसी आणि वेगवान कारवाई करुन अवघ्या काही दिवसांत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरुप सुटका केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे सर्वच स्तरातुन रांजणगाव पोलिसांच्या कार्यकुशलतेचे कौतुक होत आहे.

घटना नक्की कशी घडली…?

कारेगाव येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या काजल महेंद्र पडघाण (मुळ रा. जुमडा, ता. वाशिम) या त्यांच्या भावासह प्रमोद पाटील व तीन वर्षीय मुलगा कु आयुष यांच्यासोबत राहत होत्या. काजल व त्यांचा भाऊ हे दोघेही रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कंपनीमध्ये कामाला जात असल्याने, लहान मुलाची देखभाल करणे त्यांच्यासाठी कठीण होत होते. त्यामुळे त्यांच्या शेजारीच मागील आठ ते दहा महिन्यांपासून भाड्याने राहणारे परप्रांतीय दांपत्य पुजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव व तिचा पती अर्जुनकुमार यादव (मुळ रा. लोआलगान, चौसा, बिहार) यांच्यावर विश्वास ठेवून काजल पडघाण या रोज आपल्या मुलगा आयुषला तिच्याकडे सांभाळण्यासाठी सोपवत होत्या.

शेजाऱ्यांवर विश्वास ठेवला पण…

दि १२ सप्टेंबर २०२५ रोजी काजल पडघाण या आयुष (वय ३) याला नेहमीप्रमाणे शेजारच्या पुजादेवी यादव यांच्याकडे सांभाळण्यासाठी देऊन कामावर गेल्या होत्या. संध्याकाळी कामावरुन काजल आणि त्यांचा भाऊ प्रमोद पाटील घरी परतले असता घरात ना मुलगा होता, ना पुजादेवी यादव व तिचा पती अर्जुन यादव होते. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांचे मोबाईल बंद आढळले. त्यामुळे त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने मुलगा आयुष आणि यादव दांपत्याचा शोध घेतला. मात्र काहीच सुगावा लागला नाही. ते मुलासह परत येतील असे वाटल्याने काजल यांनी दोन दिवस वाट पाहिली. परंतु ते परत न आल्यामुळे दि. दि १५ सप्टेंबर २०२५ रोजी काजल पडघाण यांच्या फिर्यादीवरुन रांजणगाव MIDC पोलीसांनी पुजादेवी अर्जुन यादव व तिचा पती अर्जुन यादव (मूळ रा. लोआलगान, चौसा, बिहार) यांच्याविरुद्ध कु आयुष (वय ३) याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला.

आरोपीच्या शोधात रांजणगाव पोलिस थेट पंजाबमध्ये….

सदर गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांना कळविले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन मुलाची सुटका करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी बिहारमध्ये असल्याचा संशय होता. मात्र, स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास केल्यानंतर आरोपी तेथे नसल्याचे निष्पन्न झाले. पुढील तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी पंजाबमधील लुधियाना येथे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे यांना तातडीने लुधियाना येथे रवाना करण्यात आले. स्थानिक पोलीस निरीक्षक सुरेशकुमार रामल व गुरमित सिंग यांच्या सहकार्याने रांजणगाव पोलीसांनी संयुक्त कारवाई केली.

रांजणगाव पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव…

रांजणगाव MIDC पोलिसांच्या तत्पर आणि कार्यक्षम कारवाईमुळे तीन वर्षाचा अपहृत मुलगा आयुष सुरक्षितपणे परत मिळाला असून आयुषच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले. “अपहृत बालकाच्या सुटकेसाठी झटपट हालचाली करुन दाखविलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी रांजणगाव MIDC पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय सरजिने तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संकेत जाधव यांनी केली.

तसेच पंजाबमधील लुधियाना येथील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार रामल (काउंटर इंटेलिजेन्स), गुरमित सिंग (देरसी पोलीस स्टेशन) तसेच त्यांच्या पोलीस स्टाफचा या कामगिरीत मोलाचा सहभाग होता. सदर गुन्ह्यांचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण हे करत आहेत.

रांजणगाव गणपती येथे तरुणावर सहा जणांचा जीवघेणा हल्ला

रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अज्ञातांनी टाकले गतिरोधक; वाहनचालक संतप्त

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

14 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

16 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

16 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

19 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

20 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

23 तास ago