मुख्य बातम्या

अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन महसूल विभागाची निष्क्रीयता; ग्रामस्थांचा संताप

न्हावरे (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील अरणगाव गावठाण हद्दीत शासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर मुरुमाचे उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. गावातीलच काहींनी संगनमत करून जेसीबी (एम एच ४२ बी जे ९७४६) व ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे उत्खनन केले असून, उत्खनन केलेला मुरुम रस्त्यावर टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी तक्रारदार राजेंद्र बापूराव टेमगिरे यांनी शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे.

खासगी रस्त्यासाठी मुरुमाचा वापर…? 

तक्रारदारांच्या मते, अरणगाव–आलेगाव पागा जुन्या रस्त्याच्या दक्षिणेकडील सर्व्हे नंबरचा बांध सपाट करुन गट नं ९५ पर्यंत मुरुम टाकण्यात आला. मात्र हा मुरुम गावातील एका खासगी रस्त्यासाठीच वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. शासनाची कुठलीही परवानगी न घेता झालेले हे उत्खनन महसूल विभागासाठी डोकेदुखी ठरणारे आहे.

तक्रार करुनही कारवाईचा अभाव…

राजेंद्र टेमगिरे यांनी जेसीबी मालक व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. परंतु घटनेला तब्बल ३५ दिवस उलटून गेले तरी महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, महसूल विभागाच्या निष्क्रीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

उत्खनाबाबत अधिकारी गप्प का…?

या संदर्भात मंडळ अधिकारी तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. महसूल विभागाचे अधिकारी मौन बाळगून असल्याने ग्रामस्थांच्या शंका अधिकच वाढत आहेत.

 

यनिमित्ताने गावकऱ्यांनी महसूल प्रशासनाला थेट काही सवाल केले आहेत.

१) महसूल विभाग दोषींना पाठीशी घालत आहे का…?

२) शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असतानाही दोषींवर कारवाई का होत नाही…?

३) चोराला सोडून तक्रारदारालाच छळले जाणार का…?

या प्रश्नांची ग्रामस्थांना अजूनही स्पष्ट उत्तर मिळालेले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि रोषाचे वातावरण आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढत असून, महसूल विभागाने आता ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अनाधिकृत माती वाहतुकीप्रकरणी शिरूर तहसिलदारांची कारवाई, हायवा ट्रक ताब्यात

शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

शिरूर तालुक्यातील अवैध्य मुरुम, वाळू उपसा वाहतुकीवर कारवाई कधी…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

13 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

13 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

13 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

22 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

22 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

22 तास ago