मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तालुका कार्यकारिणी निवड संपन्न

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे):  रविवार (दि. ६ ऑगस्ट 2023 रोजी रांजणगाव गणपती येथील मारुती मंदिरामध्ये विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या संघटनांची संयुक्त बैठक पार पडली.बैठकीसाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रशांत काळे (जिल्हा अध्यक्ष) ,संतोष खामकर (विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री) , अजिंक्य तारू (शिरूर प्रखंड संयोजक), ऋषी न-र्हे (सहसंयोजक), विजय थोरात, संदेश साळुंखे हे पदाधिकारी उपस्थित होते.

विश्व हिंदू परिषदेच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर प्रखंड संयोजक पदी सोमनाथ बांदल, सहसंयोजक योगेश कोल्हे, सुनील शेळके रांजणगाव गणपती शहर संयोजक पदी,बलोपासना प्रमुख पदी आदित्य गलांडे , रविंद्र जगदाळे संयोजक रांजणगाव गणपती, आरती प्रमुख सार्थक पिंगळे, सह आरती प्रमुख प्रणव लुगडे, महाविद्यालयीन प्रमुख पदी आदित्य सणसे, सत्संग प्रमुख पदी ओम गाडेकर, सह सत्संग प्रमुख पदी आदिनाथ नरवडे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते व शिरूर तालुका ग्रंथालय ‌संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड, भाऊसाहेब फंड, कुमार महाराज नाणेकर, सचिन कुटे, नानासाहेब लांडे, सुनिल बत्ते, सुनिल पवार,दिग्विजय खेडकर, सचिन लांडे,केतन लांडे, आदित्य तनपुरे, रांजणगाव गणपती ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago