मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

महिलेच्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राहणारी महिला एकटी घरी असताना महिलेच्या घरी जाऊन महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेला बेशुध्द करत जबरदस्तीने महिलेवर बलात्कार करुन घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुर्यकांत चंद्रकांत शिर्के याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पिडीत महिलेची सुर्यकांत शिर्के याचे सोबत ओळख झालेली असताना सुर्यकांत हा जून २०२१ मध्ये सदर महिलेच्या घरी गेला त्याने पेप्सी शीतपेय घेऊन जाऊन त्यामध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेला पिण्यास देऊन महिलेला बेशुध्द देऊन महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करत सदर घटनेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर सदर चित्रीकरण बाबत महिलेला बोलून व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत महीलेवर वारंवार अत्याचार करु लागला. त्यामुळे महिला जानेवारी २०२३ नंतर सदर ठिकाणहून दुसरी कडे राहण्यास गेली.

मात्र सुर्यकांत हा वारंवार महिलेशी संपर्क करुन त्रास देऊन धमकी देत असल्याने आंखे महिलेने याबाबत फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सुर्यकांत चंद्रकांत शिर्के रा. हिवरे कुंभार (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध बलात्कार सह आदी गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहे.

सप्टेंबर २०२२ मध्ये देखील सुर्यकांत याने एका महिलेचे कपडे बदलताना फोटो काढून महिलेशी संपर्क करुन तुझे अश्लील फोटो माझ्याकडे आहे तू मला भेट नाहीतर मी तुझे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देऊन महिला भेटल्यानंतर तिचा विनयभंग केला. तसेच महिला राहत असलेल्या सोसायटीच्या आवारात महिलेचे काही फोटो टाकलेले होते. याबाबत देखील शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

2 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

3 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

3 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

4 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

22 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago