शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथे घराच्या जिन्याच्या वादातून महिलेसह महिलेच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिला प्रशांत पांडे, शुभम प्रशांत पांडे, सुप्रिया प्रशांत पांडे, अनुभव पांडे, अनिल पांडे, रितेश गुप्ता यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जकाते वस्ती येथे राहणाऱ्या अंजली कोरी व शिला पांडे यांच्यात घराच्या जिन्याच्या वादातून भांडणे झाले. त्यानंतर पांडे यांच्या घरातील व्यक्तींनी अंजली यांना दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान अंजली यांचे पती भारत कोरी हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना देखील मारहाण केली. सदर घटनेत अंजली कोरी व भारत कोरी हे पती पत्नी किरकोळ जखमी झाले.
याबाबत अंजली भारत कोरी (वय ३८) रा. जकाते वस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. गडचम्पा ता. सोराव जि. इलाहाबाद यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शिला प्रशांत पांडे, शुभम प्रशांत पांडे, सुप्रिया प्रशांत पांडे, अनुभव पांडे, अनिल पांडे, रितेश गुप्ता सर्व रा. जकाते वस्ती शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी व पोलीस हवालदार चंद्रकांत काळे हे करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…