शिरूर डीबी पथक व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, केवळ दोन तासांच्या आत आरोपींना शिरूर डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ ते सायं ५.४५ या वेळेत शिरूर शहरातील प्रकाश धारिवाल यांच्या जमिनीच्या वॉल कंपाउंडशेजारी संतोष मारुती ढोबळे (वय २०, रा. वाडा कॉलनी, शिरूर) याचा त्याच्या परिचितांनी निर्घृण खून केला. आरोपी सचिन मांमडवाड, यश मांदीलकर आणि त्यांचा एक साथीदार यांनी संतोषला बोलावून घेतले आणि जुन्या वादातून त्याच्या डोक्यावर व तोंडावर दगडाने वार करून त्याचा जागीच खून केला.या घटनेवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सागर शेळके, राहुल भागवत यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असताना, पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी साईनगर, शिरूर परिसरात असल्याचे समजले. तत्काळ सापळा रचून पोलिसांनी शिताफीने आरोपी सचिन मांमडवाड (वय २४, रा. सिद्धार्थनगर, शिरूर), यश उर्फ श्रेयस मांदीलकर (वय २०, रा. साईनगर, शिरूर) आणि एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली.
दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. तसेच विधीसंघर्षित बालकास बालन्याय मंडळ, येरवडा, पुणे येथे हजर करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सागर शेळके, राहुल भागवत, हनमंत नकाते, गोविंद खटींग, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, परसराम सांगळे, अक्षय कळमकर, सचिन भोई, विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे, अजय पाटील, रविंद्र काळे, वैभव शेलार, रविंद्र आव्हाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजु जाधव आणि सागर धुमाळ यांनी सहभाग घेतला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या घटनेने शिरूर परिसरात एकच खळबळ उडाली होती.पोलिसांच्या तात्काळ आणि अचूक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळे मनुकेही अनेक पोषक घटकांनी…
१) कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते. कसे बनवावे:…
१) प्रथिनेयुक्त आहार: प्रथिनेयुक्त आहार जसे की मांस, मासे, अंडी, दही, चीज, सोया इत्यादी वजन…
मुंबई: राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या…
मुंबई: राज्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027-28 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे. मोठ्या…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील नियमित, कंत्राटी तसेच बाह्ययंत्रणेद्वारे महामंडळात प्रशासकीय कामकाज…