मुख्य बातम्या

Video; शिरुर तालुक्यात जमीनीच्या ताब्याच्या वादातुन सिनेस्टाईल हाणामारी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावात जमीनीचा ताबा घेण्याच्या वादातुन एखाद्या दक्षिणात्य चित्रपटाचे कथानक शोभेल अशी सिनेस्टाईल हाणामारी झाली. न्यायालयात खटला प्रलंबित असलेल्या शेतीचा ताबा घेण्यासाठी जबरदस्तीने शेतात घुसून ट्रॅक्टरने पिके उध्वस्त केली गेली. तसेच विरोध करणाऱ्या शेतकऱ्याला आणि महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात काशीनाथ भाकरे व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी अविनाश बापु जाधव (वय ५५, रा. आमदाबाद, ता. शिरुर) यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गट क्र. १६२ मधील जमीन त्यांच्या वडिलांच्या नावावर असून त्याविषयी शिरुर न्यायालयात वाद चालु असुन ती बाब न्यायप्रविष्ट आहे. तरीसुद्धा १५ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास काशीनाथ भाकरे हा दोन निळ्या व दोन लाल रंगाच्या नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरसह काही इसमांना घेऊन त्यांच्या शेतात घुसला.

या ट्रॅक्टरनी भेंडी, मका, कांदा व गवत पिके नांगरुन टाकत शेतातली पाइपलाइनही उखडली. हे सर्व नुकसान पाहून जाधव यांनी विरोध केला असता, काशीनाथ भाकरे व त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर काठीने व हाताने हल्ला केला. एवढ्यावर न थांबता जाधव यांच्या पत्नी स्वाती जाधव व वहिनी चंद्रकला जाधव यांनाही काही महिलांकडुन मारहाण करण्यात आली.

या घटनेच्या वेळी १५ ते २० महिला व तब्बल १०० हुन अधिक पुरुषांचा जमाव शेतात उपस्थित होता. त्यांच्या तावडीतुन जाधव कुटुंब कसेबसे सुटले आणि त्यांनी तातडीने शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सर्वांची वैद्यकीय तपासणी करत गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक फौजदार पी ए गायकवाड हे करत आहेत.

दादागिरी करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी…

या घटनेने आमदाबाद गावासह पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली असुन, या जमिनीबाबत न्यायालयीन वाद प्रलंबित असताना अशी ‘दादागिरी’ करण्याचे धाडस करणाऱ्या तसेच १५ ते २० महिला आणि १०० पुरुषांचा जमाव जमवुन दहशत करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

शिरुर तालुक्यात कायदा अन सुव्यवस्था धोक्यात…

शिरुर तालुक्यातील निर्वी येथे काही दिवसांपुर्वीच जमिनीच्या वादातुन कोयत्याने हाणामारी झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर काहीच दिवसात आमदाबाद मध्ये तर १०० पुरुष आणि १५ ते २० स्त्रिया असा सुमारे १२० जणांनी जमाव जमवत दादागिरी अन दहशत माजवत ट्रॅक्टरच्या साह्याने उभे पिक जमीनदोस्त करत जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे कायदा अन सुव्यवस्थेचे ‘तीन तेरा अन नऊ बारा’ वाजले असुन वरिष्ठ पोलिस अधिकारी फक्त ‘मलिदा’ खाण्यात व्यस्त आहेत अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

Video; जीवंतपणी आशा तुटल्या, मृत्यूनंतरही उजेड नाही ‘दत्तक’ गावातील स्मशानभुमीची दुरावस्था

Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago