आरोग्य

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण दिसून येतात. ही समस्या पुरुषांच्या पेक्षा महिलांना जास्त त्रास देते. ज्या लोकांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते ते लोक एनिमियाचे शिकार होतात. एनिमियाच्या रूग्णा मध्ये विटामिन बी, लोह तत्व, फोलिक एसिडचे प्रमाण कमी होते. कधीकधी अनुवांशिक कारणामुळे देखील हा रोग होऊ शकतो.

जर तुमच्या शरीरात देखील रक्ताची कमी असेल तर आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या. चला पाहूया आहारामध्ये कोणत्या वस्तू घेतल्यामुळे रक्त वाढ होते आणि एनिमिया दूर होतो.

Blood Increasing food

१) एक लिंबू एक ग्लास पाण्यात पिळून त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा आणि पिऊन टाका. हा उपाय रोज केल्यामुळे रक्त वाढ लवकर होते.

2) सोयाबीन मध्ये विटामिन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. एनिमियाच्या रुग्णासाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे. सोयाबीन उकडून तुम्ही खाऊ शकता.थोडेसे सेंधव मीठ आणि थोडी मिरी पावडर डाळींबाच्या ज्यूस मध्ये मिक्स करून दररोज पिण्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

३) गुळा सोबत शेंगदाणे खाण्यामुळे शरीरातील आयरन वाढते. एनिमियाच्या आजारात पालक औषधा सारखे काम करते. पालक मध्ये विटामिन ए, सी, बी 9, आयर्न, फाइबर आणि कैल्शियम अधिक प्रमाणात असते. पालक एकावेळीच वीस टक्के पर्यंत आयर्न वाढवू शकते. पालक तुम्ही भाजी अथवा सूप करून करू शकतात.

४) रक्त वाढवण्याचा घरगुती उपाय म्हणून तुम्ही टमाटर वापरू शकता. ताबडतोब रक्त वाढीसाठी एक ग्लास टमाटयाचा रस प्यावा. तुम्ही सूप करूनही पिऊ शकता, वाटल्यास सफरचंद आणि टमाटरचे ज्यूस एकत्र करून पिऊ शकता. बॉडी मधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मक्याचे दाणे पण खाणे फायदेशीर होईल. हे पोष्टिक असतात तुम्ही हे भाजून किंवा उकळवून खावू शकतात.

5) थोडेसे मध एक ग्लास बीटच्या रसात मिक्स करून पिण्यामुळे शरीराला आयरन अधिक प्रमाणात मिळते ज्यामुळे रक्त तयार होते.

६) हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी थोडेसे मीठ लसणा मध्ये मिक्स करून चटणी बनवा. ही चटणी खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होईल.

७) शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी दुध आणि खजूर खाणे उत्तम उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्याच्या काही वेळ अगोदर दुधामध्ये खजूर टाकावे आणि दुध प्यावे. दुध प्यायल्या नंतर खजूर खावे. एक ग्लास सफरचंद ज्यूस घ्यावे. त्यामध्ये एक ग्लास बीटाचा रस आणि चवीनुसार मध मिक्स करा. हे दररोज प्या. या ज्यूस मध्ये लोह तत्व अधिक असते.

८) 2 चमचे तीळ 2 तास पाण्यात भिजत ठेवा. पाणी गाळून तिळाची पेस्ट बनवा. यामध्ये 1 चमचा मध टाका आणि दिवसातून दोन वेळा हे खावे.

९) पिकलेल्या आंब्याचा गर दुधा सोबत घेतला गेल्यास रक्तवाढ होते.

१०) पालक, राई, हिरवे वटाणे, मेथी, कोथिंबीर, पुदिना आणि टमाटर हे आपल्या भोजना मध्ये समाविष्ट करा.

११) जांभूळ आणि आवळ्याचा रस समान प्रमाणात घेऊन पिण्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. रक्ताची कमी होते नाही.

१२) सिंघाडा शरीराला शक्ती देते आणि रक्त वाढ करते. यामध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे पोषक तत्व असतात. कच्चे सिंघाडेचे सेवन करणे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वेगाने वाढवते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

9 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

9 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

9 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

9 तास ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

9 तास ago

पदविका विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय!

MSBTE कडून अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि संगणक केंद्राची उभारणी मुंबई.: पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या…

9 तास ago