MSBTE कडून अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओ आणि संगणक केंद्राची उभारणी
मुंबई.: पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. K-Scheme अंतर्गत डिजिटल अध्ययन साहित्य निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई-कंटेंट स्टुडिओचे आणि शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे स्थापन करण्यात आलेल्या बहुउद्देशीय संगणक केंद्राचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
व्हिडिओ व्याख्याने, द्विभाषिक ई-कंटेंटचा विद्यार्थ्यांना लाभ
पदविका अभ्यासक्रमातील विषय विद्यार्थ्यांना अधिक सुलभतेने समजावेत, स्वयंअध्ययनाची सवय विकसित व्हावी आणि परीक्षेची तयारी प्रभावीपणे करता यावी, या उद्देशाने MSBTE ने K-Scheme अंतर्गत निवडक विषयांसाठी डिजिटल अध्ययन साहित्य विकसित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये ई-ट्युटोरियल्स, द्विभाषिक ई-कंटेंट, प्रयोगशाळा हस्तपुस्तिका, व्हिडिओ व्याख्याने, सादरीकरणे आणि मार्गदर्शक वाचन साहित्याचा समावेश असणार आहे.
या डिजिटल साहित्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातील अध्यापन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येणार असून, घरबसल्या अभ्यास, उजळणी आणि परीक्षेची तयारी करणेही सोपे होणार आहे.
रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी संगणक केंद्र
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांची रोजगारक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त बहुउद्देशीय संगणक केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, तांत्रिक आणि संगणकीय कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या दोन्ही सुविधांमुळे तंत्रशिक्षण क्षेत्रात डिजिटल अध्ययनाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच व्यावहारिक कौशल्य विकासालाही चालना मिळणार आहे.
मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांशी संवाद; वसतिगृह बांधकामाची पाहणी
उद्घाटनानंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शासकीय तंत्रनिकेतनमधील विविध सुविधांची पाहणी केली. महाविद्यालयाच्या उपहारगृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि शैक्षणिक अनुभव जाणून घेतले.
तसेच संस्थेतील मुला-मुलींच्या नवीन वसतिगृहाच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून हे काम निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तंत्रशिक्षण संचालनालय तथा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अमोल मुत्याल, मंडळाचे सचिव डॉ. मारुती जाधव यांच्यासह विभागातील व मंडळातील अधिकारी उपस्थित होते.
शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…
पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…
थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…
मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…
शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…