आरोग्य

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. यातील पोषक तत्वांमुळे नारळ पाणी एक नॅचरल इलेक्ट्रोलाइट ड्रिंक बनतं. तसेच नारळ पाण्यात अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्स, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखे महत्वाचे मिनरल्सही भरपूर असतात.

नारळ पाणी तसं तर सगळ्यांसाठीच हेल्दी असतं. मात्र, अनेक फायदे असूनही नारळ पाणी काही लोकांसाठी नुकसानकारक असतं. आरोग्या संबंधी काही समस्या किंवा स्थितींमध्ये नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. अशात कोणत्या लोकांसाठी नारळ पाणी नुकसान कारक ठरू शकतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेच आज जाणून घेऊया.

डायबिटीसने पीडित रूग्ण

जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण नारळ पाण्यात नॅचरल शुगर असते, ज्यामुळे याचं सेवन केल्याने डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.

किडनीची समस्या असेल तर

नारळ पाण्यामध्ये हाय पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांसाठी हे नुकसान कारक ठरू शकतं. किडनीची समस्या असलेल्या लोकांनी जर नारळ पाणी प्यायलं तर त्यांना हायपरकेलेमिया होण्याचा धोका असतो.

हाय ब्लड प्रेशर असलेले

नारळ पाण्यात सोडिअमचं प्रमाणही भरपूर असतं. याने ब्लड प्रेशर वाढू आणि कमी होऊ शकतं. त्यामुळे नारळ पाणी ब्लड प्रेशर कमी करण्याचं औषध घेणाऱ्या लोकांनी नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.

ज्यांची सर्जरी झाली आहे

सर्जरी दरम्यान आणि नंतर ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यात होणारी अडचण दूर करण्यासाठी ठरलेल्या सर्जरीच्या कमीत कमी एक आठवडाआधी नारळ पाणी पिणं बंद केलं पाहिजे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

7 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

8 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

8 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

8 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

8 तास ago

राहुल गांधींचे आंदोलन बेजबाबदार; पंतप्रधान निवासस्थानी घातपाताचा कट होता का? एकनाथ शिंदेंचा सवाल

नीट पेपरफुटीनंतर केंद्राने कठोर पावले उचलली; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण केल्याचा विरोधकांवर आरोप मुंबई: काँग्रेसचे विरोधी…

8 तास ago