नीट पेपरफुटीनंतर केंद्राने कठोर पावले उचलली; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण केल्याचा विरोधकांवर आरोप
मुंबई: काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली. आंदोलनास परवानगी नसलेल्या ठिकाणी लोकांना जमण्याचे आवाहन करून राहुल गांधींना नेमके काय साध्य करायचे होते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाबत काही घातपाताचा कट होता का किंवा देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, अशी शंका व्यक्त केली.
राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असून त्यांच्यावर मोठी घटनात्मक जबाबदारी आहे. अशा पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून चुकीचा पायंडा पाडल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ज्या ठिकाणी कोणालाही आंदोलन करता येत नाही, त्या ठिकाणी लोकांना बोलावणे अत्यंत बेजबाबदारपणाचे असून विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली.
नीट परीक्षेच्या पेपरफुटीची घटना दुर्दैवी असल्याचे मान्य करत शिंदे म्हणाले की, केंद्र सरकारने त्यानंतर तातडीने कठोर पावले उचलली. नीटची फेरपरीक्षा पारदर्शक आणि काटेकोरपणे घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे २० ते २२ लाख विद्यार्थी बसले, त्यापैकी जवळपास ११ लाख विद्यार्थी पात्र ठरले. त्यानंतर जेईई आणि सीयूईटी (कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षाही सुरळीत पार पडल्या. या तीन प्रमुख परीक्षांमध्ये मिळून ४० ते ५० लाख विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेवर स्वतः लक्ष ठेवत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सर्वोच्च स्तरावरून हस्तक्षेप करण्यात आला. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचे काम सरकारने केले, मात्र विरोधकांनी त्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…