CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
बदललेल्या जीवनशैलीमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडून अनेक आजार कमी वयातच मागे लागत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे थायरॉईड. हा त्रास अनुवंशिक स्वरुपाचाही असतो. हायपोथायरॉईड आणि हायपर थायरॉईड असे दोन प्रकार यामध्ये आहेत. ज्या लोकांना याचा त्रास असतो त्या लोकांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे औषधी तर घेतलीच पाहिजेत, पण त्यासोबतच काही व्यायामही केले पाहिजेत. तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर हे काही झटपट होणारे सोपे व्यायाम पाहा अगदी ५ ते ७ मिनिटांत बसल्याबसल्या तुम्ही हे व्यायाम करू शकता.
थायरॉईडचा त्रास नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते उपाय करावे
हायपर किंवा हायपो असा कोणत्याही प्रकारचा थायरॉईडचा त्रास असेल तरीही हे काही व्यायाम तुम्हाला निश्चितच उपयोगी ठरू शकतात.
१) सगळ्यात पहिला व्यायाम करण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसा. मान वर करून आकाशाकडे पाहा. दोन्ही तळहात पाठीमागे घेऊन जमिनीवर टेकवा आणि तोंडाने सिंहमुद्रा केल्याप्रमाणे चेहरा करून आवाज करा. असं ५ वेळा करावे.
२) दुसरा व्यायाम करण्यासाठी मान खाली घ्या. गळ्यावर हनुवटी टेकवून थोडा दाब द्या आणि ‘ओम’कार म्हणा. यानंतर ओठ बंद करा आणि ‘ओम’कार मधला फक्त ‘म’कार ५ वेळा म्हणा.
३) तिसरा व्यायाम करण्यासाठी मान पुन्हा वर करून छताकडे पाहा आणि तोंड उघडा आणि बंद करा. असं साधारण १० वेळा करा.
४) यानंतर मान खाली करा. हनुवटीने गळ्यावर दाब द्या आणि सिंहगर्जना केल्याप्रमाणे जीभ बाहेर काढून तोंडाने मोठा आवाज करा. हे देखील ५ वेळा करावे.
५) यानंतर हनुवटी तशीच गळ्यावर टेकलेली ठेवावी आणि तोंडातील लाळ गिळताना घशाच्या जशा हालचाली होतात तसेच ८ ते १० वेळा करावे.
(सोशल मीडियावरून साभार)
सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…
रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…
नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…
जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…
मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…
काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…