आरोग्य

चष्मा लावल्याने नाकावर काळे डाग पडले त्यावर ८ घरगुती उपाय

चष्मा लावणे ही आता एक कॉमन गोष्ट झाली आहे. आजकाल लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच चष्मा असतो. एकदा का चष्मा लागला की तो कायम वापरावाच लागतोच. चष्मा सतत डोळ्यांवर लावल्यामुळे आपल्या नाकावर आणि डोळ्यांच्या खाली त्या चष्म्याचे हळुहळु काळे डाग पडू लागतात. या काळ्या डागांमुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य हरवून जाते. चष्मा लावलेला नसताना हे डाग खूप स्पष्ट उठून दिसतात. आपले नाक, कपाळ आणि डोळ्यांखालील चष्म्याचे हे काळे डाग काढून टाकण्यासाठी आपण काही सोप्या आणि घरगुती उपायांचा वापर करु शकतो.

1) एलोवेरा जेल

चष्म्यामुळे स्किनवर पडलेले काळे डाग कमी करण्यासाठी आपण एलोवेरा जेलचा वापर करु शकता. एलोवेरा जेलमध्ये लिंबाच्या रसाचे ३ ते ४ थेंब घालून या मिश्रणाने डागांवर मालिश करावी. काही आठवड्यातच हे डाग कमी होतात.

2) बटाट्याची पेस्ट

बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो. स्किनवरील चष्म्याचे काळे डाग घालवण्यासाठी आपण कच्चा बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्याची पातळसर पेस्ट तयार करून त्या डागांवर लावू शकतो. यासोबतच कच्च्या बटाट्याच्या रसात ३ ते ४ थेंब मध घालून या मिश्रणाने डागांवर मसाज करून घ्यावा. यामुळे डाग कमी होण्यास मदत मिळते.

3) काकडी

आपल्या स्किनवर पडलेले चष्म्याचे काळे हट्टी डाग घालवण्यासाठी काकडीचा वापर करता येऊ शकतो. यासाठी काकडीच्या गोलाकार चकत्या कापून घ्याव्यात. या गोलाकार चकत्या एका डिशमध्ये ठेवून त्या फ्रिजरमध्ये थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्याव्यात. त्यानंतर थोड्या वेळाने या काकडीच्या चकत्या फ्रिजमधून काढून त्या थेट डागांवर ठेवाव्यात. त्याचबरोबर या चकत्या हलकेच डागांवर स्क्रब करुन घ्याव्यात. यामुळे काळे डाग कमी होतात.

4) लिंबाचा रस – पुदिना

लिंबाचा रस हे काळे डाग घालवण्याचा एक रामबाण उपाय आहे. यासाठी लिंबाच्या रसात पुदिन्याच्या पानांची पेस्ट करून ती मिक्स करावी. हे दोन्ही जिन्नस एकत्रित करून तयार मिश्रण कापसाच्या बोळ्यावर लावून थेट डागांवर लावावे. १५ तें २० मिनिटे हे तसेच स्किनवर लावून ठेवावे त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

5) बदामाचे तेल

नेहमी चष्मा घातल्याने स्किनवर पडणारे काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही बदामाचे तेलही लावू शकता. यासाठी बदामाचे तेल घेऊन ते काळ्या डागांवर लावून ५ मिनिटे मसाज करावा. हा उपाय केल्याने अधिक फायदा होऊ शकतो.

6) गुलाब पाणी

व्हिनेगरमध्ये गुलाब पाणी मिसळून हे तयार मिश्रण डागांवर लावा. हा उपाय केल्याने काहीच दिवसातच काळे डाग कमी होऊ लागतील आणि त्या भागातील आपली स्किनही उजळून निघेल.

7) अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर 

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून हे मिश्रण डागांवर लावल्याने काळे डाग दूर होण्यास मदत होते. यासाठी कापसाचा बोळा घेऊन व्हिनेगर आणि पाण्याच्या मिश्रणात भिजवा आणि चष्म्याच्या काळ्या डागांवर लावा. यामुळे काही दिवसात फरक दिसू लागेल.

8) संत्र्याची साल 

संत्र्याच्या सालींची पेस्ट तयार करा त्यात कच्च दूध घाला आता हे तयार मिश्रण डागांवर लावून घ्यावे. ५ ते ७ मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. काळे डाग फिकट होण्यास अधिक मदत होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

17 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

17 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

1 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

1 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

2 दिवस ago