शिरूर तालुका

शिरूर नगरपरीषदेच्या गलथान कारभाराविरोधात महाविकास आघाडीचे घंटानाद आंदोलन

शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या भ्रष्ट आणि गलथान कारभारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस आय व महाविकास आघाडी शिरूर यांच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमूख, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक आबीद शेख,काँग्रेस आय चे अजीम सय्यद, राणीताई कर्डिले,माजी नगरसेवक अशोक पवार, संतोष थेऊरकर,भीम छावा चेतन साठे,हाफीज बागवान, अँड रवींद्र खांडरे राहील शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहराध्यक्ष गीताराणी आढाव, योगेश जामदार , संतोष थेउरकर, उबाळे, विशाल जोगदंड , कलीम सय्यद,युवराज सोनार योगेश पवार, विराज आढाव, , आदित्य उबाळे अक्षय सोनवणे उपस्थित होते.

यावेळी चिरून नगर परिषदेचे अधीक्षक राहुल पिसाळ , पाणी पुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक डी बी बर्गे यांनी आंदोलन करताना त्यांच्या मागणीबाबत मागण्या पूर्ण करण्याबाबत चे पत्र दिले.

शिरूर नगरपरिषद प्रशासनाच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गलथान कारभार सुरू असून, नागरिकांचे प्रश्न याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. बांधकाम अभियंता मनमानी कारभार करीत आहे. तर मोकाट कुत्र्यांचा उच्छाद मांडला आहे. सर्वच कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अर्धवट रस्त्यांची कामे, अर्धवट पाणी पुरवठा योजना, सर्वच कामात गलथान कारभार व भ्रष्टाचार यामुळे नागरिक मेटाकुटीला आला आहे. भ्रष्ट व गलथान कारभारा विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी म्हणाले शिरूर नगर परिषदेमध्ये गेले चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असून शहरातील विविध कामा होण्यास विलंब होत आहे

शहरातील 72 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना केवळ ठेकेदाराच्या मनमानी कामामुळे व त्याला साथ देणाऱ्या शिरूर नगरपरिषद अधिकाऱ्यांमुळे संत गतीने सुरू आहे. याबाबत विचारणा केल्यावर उलट सुलट उत्तरे दिली जातात रस्त्यांची कामे नाही रस्त्यांना पडलेले खड्डे कुठलेही विकास कामे नाही जी विकास कामे केली ती सर्व अर्धवट अशा प्रकारे शिरूर नगरपालिकेचा भोंगळ कारभार सुरू असून शहरात नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने योग्य तो कारभार न केल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमुख मंगेश खांडरे म्हणाले

शिरूर नगरपरिषद अनागोंदी व मनमानी कारभार सुरू असून ठेके कोणाला द्यायचे याबाबत वाघोली वरून येऊन एकजण ठरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर शहरात केवळ पाबळ फाटा ते पाषाणमळा ही 800 मीटरची रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले असून, याबाबत तीन ठेकेदार नगर परिषदेच्या वतीने नेमले आहे त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी व्हावी तर नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेले नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago