आरोग्य

शरीरात हे संकेत दिसताच वेळीच व्हा सावध, असू शकते हायपरटेंशनची समस्या

हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेंशनची समस्या आजकाल खूप लोकांना होत आहे. ही एक अशी स्थिती आहे ज्यात धमण्यांमधून वाहणारं रक्त धमण्यांच्या आतील बाजूवर दबाव टाकतं. जास्त दबावामुळे ब्लड प्रेशर वाढतं. ज्यामुळे हायपर टेंशन होण्याचा धोका वाढतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार, पुरूषांमध्ये हायपर टेंशनची समस्या २४ टक्के आणि महिलांमध्ये २१ टक्के आढळून आली आहे.

हायपरटेंशन या समस्येला सायलेंट किलरही म्हटलं जातं. कारण काही लोकांमध्ये ही समस्या कोणत्याही स्थितीत होते आणि हे चांगलंच महागात पडू शकतं. अशात तुम्हाला हायपर टेंशन, याची लक्षणे, संकेत याबाबत माहिती असली पाहिजे. जेणेकरून तुम्हाला वेळीच योग्य ते उपचार करता येतील.

डोकेदुखी

डोकेदुखी वेगवेगळ्या कारणांनी होऊ शकते. पण ही समस्या हायपर टेंशनचं एक कॉमन लक्षण आहे. अशात डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार घ्यावे.

दम लागणे

पायऱ्या चढताना, एक्सरसाईज करताना, धावताना किंवा एखादं काम करताना श्वास भरून येत असेल तर हाही हायपर टेंशनचा संकेत असू शकतो.

चक्कर येणे

हाय ब्लड प्रेशरमुळेही डोकं वाटणे किंवा सतत चक्कर येणे या समस्या होतात. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

छातीत सतत वेदना

शारीरिक हालचाल करताना किंवा एखादं काम करताना छातीत वेदना किंवा अस्वस्थ वाटणं हा हायपर टेंशनचा संकेत असू शकतो. जास्त विचार केल्याने सुद्धा असं होतं. जास्त विचार केल्याने मानसिक तणाव वाढतो आणि यामुळे ब्लड प्रेशरही वाढतं. या स्थितीत चक्कर येणे किंवा डोकं जड वाटणे अशी लक्षण दिसू शकतात.

धुसर दिसणे

हाय ब्लड प्रेशरमुळे अनेक रेटिनल म्हणजे डोळ्यांच्या आतील काही नसा डॅमेज होत असतात. ज्यामुळे तुम्हाला धुसर दिसतं.

हाय बीपीची इतर लक्षण

हृदयाची धडधड वेगाने होणे, सतत थकवा आणि बेशुद्ध पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाकातून रक्त येणे ही हायपर टेंशनची लक्षणं आहेत.

हायपरटेंशनची कारणे काय आहेत

अल्कोहोलचं अधिक सेवन करणे

मिठाचं अधिक सेवन

एक्सरसाइज न करणे

आहारात फळ किंवा भाज्यांची कमतरता

कॉफी किंवा चहाचं अधिक सेवन

धुम्रपान करणे

वजन वाढलेलं असणे

तणाव असणे

चरबी अधिक असलेले पदार्थ खाणे

आनुवांशिकता

कसा कराल कंट्रोल

वजन वाढण्यासोबतच हायपरटेंशन वाढतं. जर वजन अधिक असेल तर झोपताना श्वासासंबंधी समस्याही होतात, याला स्लीप एप्निया असं म्हणतात. याने हायपर टेंशन अधिक वाढतं. वजन कमी करणे हे हायपर टेंशनला नियंत्रणात ठेवण्याचं सर्वात चांगलं माध्यम आहे.

दिवसातून ३० ते ६० मिनिटे एक्सरसाइज करा. याने मूडही चांगला राहतो आणि तुम्ही फिट राहता. याने मधुमेह आणि इतर हृदय रोगांचा धोका कमी होतो.

हायपरटेंशन कमी करण्यासाठी आहारात बदल करावा. फळं, भाज्या आणि कडधान्याचं सेवन करा. तसेच लो फॅट डेअरी पदार्थांचं सेवन करा.

हायपरटेंशन कमी करण्यासाठी सोडियमचं कमीत कमी सेवन करा. जास्त सोडियममुळे शरीरात द्रव्य तयार सुरू होतं. याने ब्लड प्रेशर अधिक वाढतं.

मद्यसेवन अधिक केल्याने रक्तदाबा संबंधी समस्या होतात. त्यामुळे मद्यसेवन कमी करा.

तणावामुळे हायपरटेंशन अधिक वाढतं. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी होणारा तणाव कमी करण्याकडे लक्ष द्यावं.

धुम्रपानामुळे रक्तदाब वाढतं. त्यामुळे धुम्रपान करू नका. धुम्रपान सोडल्यास हृदय रोगाचा धोकाही कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

8 तास ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

8 तास ago

शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या…

9 तास ago

भाजपाच्या तोंडात संविधान, मनात मनुस्मृती’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

‘वोट बचाओ, देश बचाओ’ महारॅलीचा भाजपाने घेतला धसका; मोदी-शाहांच्या सत्तेला हादरे बसत असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा…

9 तास ago

अमित शाहांच्या भेटीवरून राष्ट्रवादीतील मतभेदांच्या चर्चेला उमेश पाटील यांचा खुलासा

सुनेत्रा पवारांना डावलल्याच्या बातम्या फेटाळल्या! मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वातील समन्वयाच्या चर्चांना…

9 तास ago

इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या विकासकामांना गती द्या! चंद्रकांतदादा पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातील विकासकामांना गती…

9 तास ago