क्राईम

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत एकनाथ दंडवते व त्यांच्या पत्नी यमुनाबाई दंडवते (वय ८०) यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. कानातील कर्णफुले अक्षरशः ओरबाडून नेत नाकातील नथ व गळ्यातील पोत असा सुमारे २ ते ३ तोळ्यांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला आहे. या भीषण दरोड्यामुळे मलठण, टाकळी हाजी आणि कवठे येमाई परिसरात तीव्र संताप आणि प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ दंडवते आणि त्यांच्या ८० वर्षीय वृद्ध यमुनाबाई दंडवते हे मध्यरात्री घरात भर झोपेत असताना अचानक ७ ते ८ जणांच्या सशस्त्र टोळक्याने घरात घुसून धुडगूस घातला. दरोडेखोरांनी लोखंडी रॉडने दोघांवरही अमानुष हल्ला चढवला. नराधमांनी यमुनाबाई यांच्या कानातील कर्णफुले अक्षरशः ओरबाडून काढली, ज्यामुळे त्या रक्तबंबाळ झाल्या. याशिवाय नाकातील नथ आणि गळ्यातील सोन्याची पोत असा अंदाजे २ ते ३ तोळ्यांचा ऐवज हिसकावून दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. टाकळी हाजी औटपोस्टच्या हद्दीत वारंवार विद्युत रोहित्र, विद्युत मोटर, केबल चोरी, भुरट्या चोऱ्या, दुचाकी चोऱ्या या गंभीर घटना वारंवार घडत आहे. दरोडयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. तसेच टाकळी हाजी पोलीस चौकीचे पीएसआय गोविंद खटिंग आणि ए.एस.आय. राजेंद्र चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन परिसरातील गावागावात रात्रीची प्रभावी गस्त सुरू करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक जनतेकडून केली जात आहे.

शिरूर! मलठणमध्ये अष्टविनायक महामार्गावर कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू…

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी…

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

6 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

6 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

13 तास ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

13 तास ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

13 तास ago

५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा! फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे खुले आव्हान

महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…

13 तास ago