आरोग्य

बदाम आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे

बदाम खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभकारी असते. यामध्ये असलेल्या पोषक तत्वांच्या मुळे केस, आणि त्वचा निरोगी राहतातच, पण त्या शिवाय स्मरणशक्ती उत्तम राहावी या करिताही बदामाचे सेवन केले जाते. वास्तवात बदाम कितीदा नियमित खाल्ले जातात हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

दररोज चार ते पाच बदामांचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक ताकद, जीवनसत्वे, क्षार, आणि प्रथिनांच्या रूपाने मिळत असते. वजनावर नियंत्रण ठेवण्यापासून ते शरीरातील अशक्तपणा दूर करण्याची क्षमता बदामात असते. हृदयरोग असणाऱ्यांकरिताही बदामाचे सेवन लाभकारी आहे. यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी थोड्या पाण्यामध्ये बदाम भिजत घालावेत व सकाळी उठून ते खावेत. दररोज अश्या रीतीने बदाम खाल्ल्या नंतर होणारे फायदे आपल्याला जाणवतील. बदामाच्या नियमित सेवनाने नैराश्य दूर होऊन, मनस्थिती उत्तम राहण्यास मदत होते. तसेच बदमातील फायबर, प्रथिने आणि मॅग्नेशियम शरीराला लाभकारी आहे. विशेषतः मधुमेहींना याचा खास लाभ होतो.

बदामाच्या नियमित सेवनाने शरीरातील कोलेस्टेरोल कमी होण्यास मदत होते. तसेच यामधील कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर पोषक तत्वांमुळे हाडांना बळकटी मिळते. त्यामुळे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच बदाम लाभकारी आहेत. ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांनी दररोज चार ते पाच बदामाचे सेवन करावे. बदामाच्या सेवनाने भूक शमते व वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा होत नाही. बदामाच्या सेवनाने त्वचा नितळ आणि सुंदर राहण्यास मदत होते. यामध्ये इ-जीवनसत्व प्रचुर मात्रे मध्ये असल्याने बदाम केस आणि नखे यांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहेत. बदामाच्या सेवनामुळे बद्धकोष्टही दूर होण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago