आरोग्य

थकवा येण्याचे कारण नि उपाय

हिवाळ्यात ऑफिसात मन लागत नाही, तर घरी करमत नाही. ही समस्या प्रत्येकालाच भेडसावत असते. ‘काम धेलाभरचं नाही आणि रिकामपण कवडीभरचं नाही’ अशीच गत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भविष्यात ही समस्या कायमची डोके दुखी होऊ शकते. त्यावर वेळेतच उपाययोजना करणे आवश्यक आहे. थंडी जशी जशी वाढते, तसा आळस वाढत असतो. हा आळस म्हणजेच थकवा असतो. शारीरिक व मानसिक अशा दोन प्रकारे थकवा असतो. आराम करून शारीरिक थकान चटकन आपण घालवू शकतो. मात्र मानसिक थकवा घालविण्यासाठी खूप अवधी लागतो. थकवा हा कोणत्या प्रकारचा आहे, हे कळत नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र हा थकावा कशामुळे आला आहे, त्यावर उपाययोजना करणे हे आवश्यक असते.

झोप लवकर का लागते

जास्त प्रमाणात अंग मेहनत करणे, व्यायाम करणे.

झोप पूर्ण न होणे.

अधिक तनावात राहणे.

शरीरात रक्त कमी असणे, अशक्तपणा.

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असणे.

थकव्याची लक्षणे

हिवाळ्यात अधिक थकवा येत असल्याने उत्साह कमी होतो. त्यामुळे थकव्याची लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना केली पाहिजे.

कामात मन न लागणे. नकारात्मक विचारामध्ये वाढ होणे.

अशक्तपणा येणे, दिवसरात्र झोप लागणे.

थकवा दूर करण्याचे उपाय

हिवाळयात उन्हात उभे राहिल्याने शरीरात स्फूर्ति येत असते. थकवाही हळू हळू कमी होत असतो.

हाताच्या दोन बोटांनी चेहर्‍यावर हलकीशी मालिश करावी. तसे केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. तसेच मन व शरीरावरील ताण कमी होतो.

सुगंधित तेलाने शरीराची‍ मालिश केल्यानेही थकवा दूर केला जातो.

दररोज योग अथवा व्यायाम करावा, मात्र अति व्यायाम केल्याने ही थकवा येतो.

किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे.

तनावमुक्त राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

3 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

7 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

7 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

7 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

7 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

8 तास ago