हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. यातील पोषक तत्वांमुळे नारळ पाणी एक नॅचरल इलेक्ट्रोलाइट ड्रिंक बनतं. तसेच नारळ पाण्यात अॅंटी ऑक्सिडेंट्स, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखे महत्वाचे मिनरल्सही भरपूर असतात.
नारळ पाणी तसं तर सगळ्यांसाठीच हेल्दी असतं. मात्र, अनेक फायदे असूनही नारळ पाणी काही लोकांसाठी नुकसानकारक असतं. आरोग्या संबंधी काही समस्या किंवा स्थितींमध्ये नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. अशात कोणत्या लोकांसाठी नारळ पाणी नुकसान कारक ठरू शकतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेच आज जाणून घेऊया.
डायबिटीसने पीडित रूग्ण
जर तुम्ही डायबिटीसचे रूग्ण असाल तर नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण नारळ पाण्यात नॅचरल शुगर असते, ज्यामुळे याचं सेवन केल्याने डायबिटीसच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
किडनीची समस्या असेल तर
नारळ पाण्यामध्ये हाय पोटॅशिअम असतं. ज्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांसाठी हे नुकसान कारक ठरू शकतं. किडनीची समस्या असलेल्या लोकांनी जर नारळ पाणी प्यायलं तर त्यांना हायपरकेलेमिया होण्याचा धोका असतो.
हाय ब्लड प्रेशर असलेले
नारळ पाण्यात सोडिअमचं प्रमाणही भरपूर असतं. याने ब्लड प्रेशर वाढू आणि कमी होऊ शकतं. त्यामुळे नारळ पाणी ब्लड प्रेशर कमी करण्याचं औषध घेणाऱ्या लोकांनी नारळ पाणी पिणं टाळलं पाहिजे.
ज्यांची सर्जरी झाली आहे
सर्जरी दरम्यान आणि नंतर ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यात होणारी अडचण दूर करण्यासाठी ठरलेल्या सर्जरीच्या कमीत कमी एक आठवडाआधी नारळ पाणी पिणं बंद केलं पाहिजे.
(सोशल मीडियावरून साभार)
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…