वातावरणातील बदलामुळे थंडी आणि पावसाच्या दिवसामध्ये किंवा घशात इन्फेक्शन झाल्याने तसेच थंड पदार्थ खाल्यामुळे घसा सुजून घसा दुखू लागतो. अनेकदा सर्दी खोकला होण्याआधी सुरवातीला घशात खवखव होणे, घशात सूज येणे, घसादुखी ही लक्षणेही असतात. घसा दुखत असल्यास कोणते उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे.
घसादुखी होण्याची कारणे…
अनेक कारणांमुळे घशात वेदना होऊ शकतात. त्यातही प्रामुख्याने वातावरणातील बदलामुळे आणि घशात इन्फेक्शन झाल्याने घसादुखी होत असते…
सर्दी, खोकला झाल्यामुळे घसादुखी होऊ शकते.
टॉन्सिल्सला सूज आल्याने,
स्वरयंत्राला सूज (Laryngitis) आल्यामुळे,
गालफुगी आजारामुळे,
एलर्जीमुळे,
वायुप्रदूषण,
सिगारेटच्या स्मोकिंगमुळे,
तसेच घशातील कँसर किंवा घशात जखम झाल्यानेही घशात दुखते.
मीठाच्या पाण्याच्या गुळण्या…
घशामध्ये दुखत असल्यास कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील सूज व वेदना कमी होतात. तसेच कोमट पाण्याने कफ निघण्यास मदत होते. या कोमट पाण्यात अर्धा चमचा हळदसुद्धा घातल्यास व गुळण्या केल्यास हा आयुर्वेदिक उपाय घसादुखीवर खूप उपयुक्त ठरतो.
आले व मध…
घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा मधाबरोबर चावून खावा. यामुळे घशात दुखणे कमी होते. आले आणि मधामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
लवंग आणि मध…
काही लवंगा मधात टाकून थोड्या वेळाने त्या लवंगा आणि मध यांचे चाटण करावे. यामुळेही घशात दुखणे कमी होण्यास मदत होते व घशाला आराम मिळतो.
लिंबू आणि मध…
ग्लासभर कोमट पाण्यात लिंबाचा अर्धा चमचा रस व एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे घशातील वेदना दूर होतात.
गरम दूध प्यावे…
घशात सूज आल्यास घसा दुखत असल्यास हळद घालून ग्लासभर गरम दूध प्यावे. यामुळे घशातील सूज व वेदना कमी होऊन घशाला आराम मिळेतो.
घसादुखी असल्यास डॉक्टरांकडे कधी जावे…?
घसादुखी ही प्रामुख्याने सर्दी, खोकला यासारख्या इन्फेक्शनमुळे होत असते. त्यावर घरगुती उपाय करून घसादुखी दूर होण्यास मदत होते. मात्र घरगुती उपाय करुनही आठवडाभर घसादुखी कमी न झाल्यास आपल्या डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. याशिवाय घसादुखी बरोबरच खालील लक्षणे दिसून येत असल्यास जास्त खबरदारी घेणे गरजेचे असते. यामध्ये घसादुखी बरोबर अन्न गिळताना त्रास होत आल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, तोंड उघडण्यास त्रास होत असल्यास, थुंकी व कफातून रक्त येत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन होणाऱ्या त्रासाचे निदान व योग्य उपचार करून घेणे गरजेचे आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…