आरोग्य

व्यायाम करण्याचे आरोग्यदायी फायदे

व्यायामाचे परिणाम जसे तात्कालिक असतात तसे दीर्घकालीनही असतात. भविष्यात काही गंभीर आजार होऊ नये म्हणून व्यायाम करावा.

गरोदर होण्यात अनेकदा अडथळ्यांचा सामना स्त्रियांना करावा लागतो. हे अडथळे टाळण्यास नियमित व्यायाम मदत करतो.

नियमित व्यायामामळे मन प्रसन्न राहातं, कामाचा ताण मनावर येत नाही. नियमित व्यायाम हा* *आनंददायी जीवनप्राप्त करुन देतो.

व्यायाम न करण्याचे स्त्रियांकडे अनेक कारणं असतात. वेळ मिळत नाही. घरात कामाचा खूप लोड असतो, घरातली कामं करुन थकायला होतं. व्यायामात वेळ* *घालवून कसं चालेल ते व्यायामाचा कंटाळा येतो इथपर्यंतची सतराशे साठ कारणं असतात. पण काहीही असलं , कितीही व्याप असले तरी महिलांनी व्यायाम करण्याचे महत्त्वाचे पाच कारणं आहेत. किमान या पाच कारणांसाठी तरी स्त्रियांनी व्यायाम करायलाच हवा.o

का करावा व्यायाम?

१) व्यायामाचे परिणाम जसे तात्कालिक असतात तसे दीर्घकालीनही असतात. भविष्यात काही गंभीर आजार होऊ नये म्हणून व्यायाम करावा. डिमेन्शिया अर्थात विस्मृतीच्या आजाराचा स्त्रियांना भविष्यात धोका असतो. हा धोका नियमित व्यायामाने टाळता येतो. जागतिक आरोग्य संघटनेने तर विस्मृतीच्या आजारावर व्यायम हे उत्तम औषध असल्याचं म्हटलं आहे.

२) गरोदर होण्यात अनेकदा अडथळ्यांचा सामना स्त्रियांना करावा लागतो. हे अडथळे टाळण्यास नियमित व्यायाम मदत करतो. गरोदर होण्यासाठी जसा व्यायाम मदत करतो तसाच गरोदरपणातला व्यायाम आईचं आणि पोटातल्या बाळाचं आरोग्य नीट राखतो . शिवाय प्रसूतीनंतर हाच व्यायाम वाढलेलं वजन कमी करण्यास मदत करतो.

३) महिलांमधे स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण जगभरात सर्वत्र वाढत आहे. व्यायामामुळे शरीर क्रियाशील राहातं. शरीर कमी क्रियाशील असणं हे कारण स्तनांच्या कर्करोगाला आमंत्रण देतं हे संशोधन आणि अभ्यासानं सिध्द झालं आहे. म्ह्णून आपल्याबाबतीतला हा धोका कमी करण्यासाठी रोज व्यायाम आवश्यक आहे.

४) घर, मल, घरातले वृध्द, ऑफिस /व्यवसाय असल्यास त्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता महिलांची दमछाक होते. यामळे मानसिक ताण वाढतो. त्याचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर, नातेसंबंधावर पडतो. हा ताण कमी करण्याचं काम रोजचा व्यायाम करतो, नियमित व्यायामामुळे मन प्रसन्न राहातं, कामाचा ताण मनावर येत नाही. नियमित व्यायाम हा आनंददायी जीवनप्राप्त करुन देतो.

५) हदयरोग आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार आता स्त्रियांनाही मोठ्या प्रमाणावर होतात. पण आरोग्यदायी जीवनशैली असेल तर अशा आजारांचा धोका कमी करता येतो. व्यायामाद्वारे आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करता येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

4 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

4 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

4 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

4 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

5 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

5 तास ago