आरोग्य

तोंड येण्याची कारणे आणि उपाय

तोंड येण्याची कारणे
कुपोषण
आहारदोष किंवा चुकीची आहार पध्दती आणि जीवनशैली.
जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइन ची कमतरता.
दात, जीभ, हिरड्या आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे.
दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन.
कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम.
तंबाखू, दारू, गुटखा याचं अतिसेवन.
मानसिक ताणतणाव.
अपुरी झोप.
अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन.
कमी प्रतिकारशक्ती.
जीवनसत्त्वांची कमतरता.
वारंवार टुथपेस्ट बदलणे.
कधी कधी काही स्त्रियांना मासिकपाळी पूर्वी देखील तोंड येतं. पण ते मर्यादित काळासाठी असतं.
तोंड येणं म्हणजे काय
तोंड येतं तेव्हा जीभ, गालाचा आतील भाग, टाळू, हिरड्या, जिभेच्या कडा, ओठाची आतली बाजू पूर्णता लाल होते. काही वेळेला पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. इतकंच नाही तर कधी कधी घशाच्या आत किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो. अशा वेळी तोंडातून गरम वाफा निघाल्याचं जाणवतं. जिभेच्या कडा खडबडीत होतात. तिथेही फोड येतात. कधी कधी ताप येतो किंवा अंगात कणकण जाणवते. पचनसंस्थेवर ताण पडून शौचाच्या तक्रारीही निर्माण होतात. त्याच बरोबर भूक मंदावणे, प्रतिकार शक्ती कमी होणे, इतर आजरांना सामोरे जावे लागतं. यासारख्या तक्रारी वारंवार तोंड येण्याने दिसून येतात. वारंवार तोंड आल्यामुळे अपचन, जुलाब, मोठ्या आतड्याचे विकार, मानसिक ताणतणाव अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं.
थोडक्यात शरीरातील बी गटातील जीवनसत्त्वांचं प्रमाण कमी झालं की त्याचा मज्जा पेशींवर परिणाम होतो. त्वचा, ओठ, गालाचा आतील भाग, जीभ आणि घसा असे पचनसंस्थेतील महत्त्वाचे पाचकरस करणाऱ्या ग्रंथी तसंच रक्त तयार करणाऱ्या ग्रंथींचं कार्य जीवनसत्त्व बी गटामुळे होत असतं. मात्र या जीवनसत्त्वांच्या अभावाने खंड पडतो आणि त्यांचं कार्य बिघडतं, त्यामुळे तोंड येतं. तोंड अगदी लहान बाळाचे ही येते. दूध पिल्यानंतर तोंडाची व्यवस्थित स्वच्छता नाही केली किंवा एखादी व्यक्ती काही कारणास्तव औषधे घेत असेल तर, एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास असेल तर अशी विविध कारणे असतात.
उपाय
तोंडाची आंतरबाह्य स्वच्छता.
पान, तंबाखू, गुटखा यांसारख्या पदार्थांचे सेवन बंद करावे.
आहारात जीवनसत्त्व आणि चोथायुक्त पदार्थाचा समावेश करावा.
भरपूर पाणी प्यावं. दिवसभरातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
पुरेशी झोप घेणे. रात्रीच्या जागरणाने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेही तोंड येतं. म्हणून किमान सहा सात तास झोपणं आवश्यक आहे.
तणावरहीत जगावं. कोणत्याही गोष्टीचा मनावर ताण आल्याने त्याच्या परिणाम प्रकृतीवर होतो.
तोंड आलेल्या ठिकाणी ग्लिसरीन लावावं आणि लाळ थुकून टाकावी. तोंडात कात धरल्यानेही आराम पडतो. त्वरित उपचार न झाल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.
आवश्यक जीवनसत्वे
बी-१ अर्थात थायमिन.
रायबोफ्लेवीन.
नायसीन.
जीवनसत्वे कोणत्या पदार्थातून मिळतील
थायमिन: सर्व प्रकारची तृणधान्य, हातसडीचा तांदूळ, कोंड्यासकट गहू, मोड आलेली कडधान्य, ज्वारी, बाजरी.
रायबोफ्लेवीन: दूध, तृणधान्य, डाळी यातून अधिक प्रमाणात मिळतं. गर्भावस्थेतील स्त्रिया, थायरॉड ग्रंथीचे आजार, संतती नियमनाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्यांना या जीवनसत्त्वाची अधिक गरज असते.
नायसीन: संमिश्र आहार. तृणधान्य आणि दूध.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

6 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

7 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

13 तास ago