मुख्य बातम्या

शिरूर! रांजणगाव गणपती परिसरात स्फोटाच्या धक्क्याने घरांना तडे; पाहा Video…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती तसेच पिंपरी दुमाला परिसरात सोमवारी (ता. २) अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाच्या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटाचा आवाज अतिशय मोठा होता आणि काही क्षण जमिनीला कंपन जाणवले. त्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर धावत आले. काही घरांच्या भिंतींना किरकोळ तडे गेल्याचे दिसून आले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही; मात्र नागरिक भयभीत झाले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, भूकंपाची शक्यता स्पष्टपणे नाकारण्यात आली आहे. प्राथमिक तपासात हा भूकंपाचा धक्का नसल्याचे सांगण्यात आले असून, अन्य कारणांचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाने या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवली असून, संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. तज्ञ पथकांकडून परिसराची पाहणी करून स्फोटाचे नेमके कारण शोधले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही अप्रमाणित माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, पुढील घडामोडींबाबत अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

पुणे ते छ. संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर वेग; खराडी ते शिरूर…

अजित पवार यांच्यावर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; शिरूरकरांना आठवणी पाठविण्याचे आवाहन…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

11 मिनिटे ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

9 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

9 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

9 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

9 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

10 तास ago