आरोग्य

मूळव्याधाची कारणे व लक्षणे…

बद्धकोष्ठता: शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण (गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.

मूळव्याधाची कारणे काय आहेत…
१) बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे.
२) प्रसूतीनंतर प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
३) गर्भधारणेदरम्यान गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे  बद्धकोष्ठता होते.
4) बराच काळ एका जागी बसून राहणे. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे.
५) चुकीची आहार पध्दती- फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन.
६) अनुवंशिकता, अतिमांसाहार.

अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.

मूळव्याधाची लक्षणे…
१) शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना
२) शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे
३) गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे आव पडणे.
४) गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.
५) पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.

अ‍ॅनिमिया: मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात.

भूक मंदावणे: शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो.

रुग्णाचे वजन कमी होते: मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.

मूळव्याधावरती घरगुती उपचार…
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात. अ‍ॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

13 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

13 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

14 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

19 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

19 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

19 तास ago