आरोग्य

टाचदुखीची कारणे व काही घरगुती उपाय…

टाचदुखीची कारणे व काही घरगुती उपाय…

हा एक वातविकार आहे. वेळीच काळजी घ्या.

कारणे

१) नियमित पोट साफ न होणे.

२) जड अन्नपदार्थ जास्तच खाणे.

३) घाईघाईने जेवणे.

उपाय

१) एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या.

२) लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा.

३) हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळसंध्याकाळ करा.

४) कोमटच पाणी प्या.

५) पोट साफ ठेवा. त्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या. किंवा एरंडेल तेल रात्री कोमट पाण्यातून घेणे.

६) हलका आहार घ्या.

७) टाचेला श्वास रोखून तेल लावून माँलिश करा. श्वास सोडल्यावर माँलिश थांबवा. नंतर पुन्हा श्वास रोखून माँलिश करा. असे ५/१० वेळा करा. रिकाम्या पोटीच करा.

८) रिकाम्या पोटी काहीवेळ श्वास रोखून टाचेवर चाला.

९) नियमित प्राणायाम करा.

१०) आवळा पदार्थ खा.

पायाच्या टाच दुखीवर घरगुती उपाय

टाचदुखी कशामुळे होते? 

बहुतांश प्रकरणी पायातील उतींचा एक पट्टा, ज्याला “प्लांटर फेशिया‘ असे म्हणतात, त्याचे नुकसान झाले किंवा तो घट्ट झाला की टाचदुखी होते. प्लांटर फेशिया हा ऊतींचा एक कडक आणि लवचिक पट्टा असतो, जो पायाच्या तळव्याखालून जातो. तो टाचेच्या हाडाला पायाच्या हाडांशी जोडतो आणि पायासाठी शॉक ऍब्सॉर्बर म्हणून कार्य करतो. या प्लांटर फेशियाचे नुकसान होऊन आतमध्ये लहान फटी (मायक्रो टियर्स) विकसित होऊ शकतात. यामुळे प्लांटर फेशिया घट्ट होऊ शकतो आणि टाचदुखी जडते. अशा वेळी आजूबाजूची ऊती आणि टाचेचे हाड यांचादेखील काही वेळेस दाह होऊ शकतो. प्लांटर फॅसायटीस हे टाचदुखीचे सर्वांत सामान्य कारण आहे.

काही सोपे उपाय

१) खड़े मीठ गरम पाण्यात टाकुन टाचा शेकाव्यात.

२) टाचदुखी हा वाताचा प्रकार आहे. होमिओपथिच्या गोळ्या घ्याव्यात

३) मऊ चपला मिळतात त्या वापराव्या.

४) फिजिओ थेरेपीचे काही सोपे एकसरसाइज जसे भिंतीला हात टेकून उभे रहायचे अणि पायाच्या बोटानी टाचा वर उचलून जागच्या जागेवर जॉगिंग करायच.

५) जमिनीवर टॉवेल पसरून पाय त्यावर ठेवून पायाच्या बोटा नी टॉवेल जवळ आणायचा.

६) टाचेवर बिब्बा घालून पहा.

७) रुईचे पान व विटेचा तुकडा गरम करून त्याने टाचा शेकणे.

८) गोडे तेलात मीठ घालून फेटावे व रात्री टाचेला लावून प्लास्टिकचा कागद बांधून झोपावे.

९) पाण्याची pet.वाटली पाणी भरून फ्रिजर मधे ठेवली. पूर्णपणे. बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहावे.सुरवातीला खुपच गार वाटते पण मग बरे वाटु लागते .असे साधारण ५ १०मिनिटे करावे. असे दिवसातुन २ ३वेळा करावे. दुसर्‍या दिवशी बराच फरक वाटेल.असे ३-४ दिवस केल्यावर खुपच फरक पडलेला जाणवेल.

१०) बर्फाच्या शेकाने स्नायूंना आलेली सूज जाते व त्यामुळे बरे वाटते.

११) योग्य प्रकारची पादत्राणे वापरणे देखील महत्त्वाचे आहे. शक्‍यतो, आपण आपल्या पायाचे बाक आणि टाचा यांना आधार आणि मऊपणा देणाऱ्या कमी ते मध्यम टाचेची पादत्राणे घालावीत. टाचा नसलेले शूज घालणे टाळावे. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत.

१२) शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करुन ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…

14 तास ago

Video; न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या भंगाराला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वेळीच आग आटोक्यात

शिंदोडी (तेजस फडके) न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात…

15 तास ago

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

2 दिवस ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

2 दिवस ago

कासारी येथील महानुभव आश्रमाच्या आवारात जेसीबीच्या साह्याने तोडफोड केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्याच्या कडेला कासारी (ता. शिरुर) गावच्या हद्दीत असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिर…

4 दिवस ago

केसनंद येथील भीषण अपघातात शिरुर तालुक्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण जखमी

वाघोली (प्रतिनिधी) केसनंद (ता.हवेली) येथे रविवार (दि २८) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजुन 10 मिनिटांच्या…

4 दिवस ago