शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने गरोदर मातांना ठेकेदारामार्फत पुरविण्यात आलेल्या पोषण आहारात आंबळे (ता. शिरुर) येथे अळ्या व सोनकिडे सापडल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार दि 12 एप्रिल 2024 रोजी घडला होता. त्यामुळे गरोदर मातांना असा निकृष्ट आहार पुरविणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केली असुन याबाबतचे निवेदन आज (दि 15) रोजी शिरुर येथील पंचायत समितीच्या महिला व बालविकास विभागात देण्यात आले.
आंबळे येथे पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने गरोदर मातांना ठेकेदारामार्फत पुरविण्यात आलेल्या पोषण आहारात अळ्या व सोनकिडे निघाल्याचे वृत्त सर्वप्रथम “शिरुर तालुका डॉट कॉम” ने सडेतोड आवाज उठवत प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांनी याची दखल घेतली. त्यानंतर सर्वात प्रथम खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी या सर्व प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सरकार लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रशासन वाऱ्यावर सोडले असल्याची टिका केली होती.
या सर्व प्रकारानंतर राज्य सरकारला खडबडून जाग आली आणि संबंधित खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या संपुर्ण प्रकारची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोभे यांनी आज प्रत्यक्ष आंबळे (ता. शिरुर) येथे अंगणवाडीत जाऊन सदर पोषण आहाराचा तक्रारदार महिलेच्या समक्ष पंचनामा केला. त्यानंतर हा आहार ताब्यात घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार असुन त्याचे रिपोर्ट आल्यानंतर संबधित ठेकेदार दोषी आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे चोभे यांनी सांगितले.
या सर्व प्रकारानंतर शिरुर तालुक्यात कायमच सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या रामलिंग महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी पुणे जिल्हा परीषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने गरोदर मातांना ठेकेदारामार्फत पुरविण्यात आलेल्या निकृष्ट पोषण आहाराबाबत सखोल चौकशी करुन दोषी असणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याबाबत शिरुर पंचायत समिती येथील महिला व बालविकास विभागाला निवेदन दिले. यावेळी डॉ वैशाली साखरे, डॉ स्मिता कवाद, गिता आढाव, शकीला शेख, मोनिका मोहिते आदी महिला उपस्थित होत्या.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…