क्राईम

शिरुर- न्हावरा रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोठे): शिरुर -न्हावरा रस्त्यावर करडे गावच्या हददीत एका ट्रक्टरने महिंद्रा पिकअपला भरधाव वेगाने जोरदार ठोस दिल्याने अपघातात ताराचंद ज्ञानदेव वहिल रा. शिक्रापूर यांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ३१) रोजी रात्री ०९ वाजल्याच्या सुमारास करडे गावच्या हद्दीत आय. एफ. बी. कंपनी पासुन दीड कि. मी अंतरावर, न्हावरा बाजुला शिरुर ते न्हावरा रोड वर ट्रॅक्टर नं. एम.एच. ४२ वाय ३६४८ या ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगात रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणाने चालवून महिंद्रा पिकअप टेम्पो एम.एच. १४ सी. पी. ९३७२ यास ठोस देवून अपघात करुन अपघातात फिर्यादी अशोक राऊत यांचा कामगार ताराचंद ज्ञानदेव वहिल (वय ४२ वर्ष )रा. शिक्रापुर (ता. शिरुर), जि. पुणे, मुळ रा. मिरजगाव ता. कर्जत, जि. अहमदनगर यास गंभीर दुखापती होण्यास व त्याच्या मृत्युस तसेच कादिर खान याचे गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला झाला.

तसेच फिर्यादी महिंद्रा पिकअप टेम्पो एम.एच. १४ सी.पी. ९३७२ व ट्रॅक्टर नं. एम.एच. ४२वाय ३६४८ चे नुकसानीस कारणीभूत होवुन अपघाताची खबर न देता तो निघुन गेला. म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात ट्रॅक्टरचालका विरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढिल तपास सहाय्यक फौजदार चव्हाण हे करीत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago