भारतात हृदयरोगांचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हृदयरोगाच्या मुख्य कारणांमध्ये डायबिटीस, हायपरटेंशन इत्यादींचा समावेश आहे. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीला हृदयरोगाबाबत जागरूक असायला हवं. काही हृदयरोगाची माहिती तुम्ही घरीच घेऊ शकता. यासाठी बीपी, हार्ट रेट मॉनिटरींग, पायऱ्या चढणे अशा गोष्टी करू शकता किंवा बोटांच्या माध्यमातून ब्लॉकेजची माहिती मिळवू शकता.
घरीच पटवा हार्ट ब्लॉकेज ओळख…
हार्ट ब्लॉकेज आज एक मोठी समस्या बनली आहे. जेव्हा हार्टच्या धमण्यांमध्ये प्लाक जमा होतो, तेव्हा ब्लड सर्कुलेशन सुरळीत होत नाही. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हार्ट ब्लॉकेज झाल्यावर काही लक्षणं अशीही असतात जी तुम्ही घरीच जाणून घेऊ शकता. हार्ट ब्लॉकेजची माहिती मिळवण्यासाठी आज आम्ही काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.
हार्ट ब्लॉकेजची सुरूवातीची लक्षणं…
स्मोकिंग, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या स्थिती हार्ट ब्लॉकेजचा धोका अधिक वाढवतात. तेच हार्ट ब्लॉकेजच्या सुरूवातीच्या लक्षणांमध्ये छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, कमजोरी आणि थंडी लागणे इत्यादींचा समावेश आहे. या लक्षणांवर लक्ष देऊन तुम्ही हार्ट ब्लॉकेजची ओळख पटवू शकता.
ब्लड प्रेशर मॉनिटर करा…
हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी ब्लड प्रेशर मॉनिटर केलं पाहिजे. एका व्यक्तीचा नॉर्मल बीपी 120/80 असायला हवा. पण वय, वजन, लिंग औषधांमुळे हा कमी जास्त होऊ शकतो.
हार्ट रेट ट्रॅक करा…
नॉर्मल हार्ट रेट एका मिनिटात 60 ते 100 असतं. जर यात बदल होत असेल तर याचा हार्ट हेल्थवर वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे गरजेचं आहे की, आपलं हार्ट रेट मॉनिटर करत रहा. आपल्या मनगटावर दोन बोटं ठेवूनही हार्ट रेट चेक करू शकता.
पायऱ्यांची टेस्ट…
हार्ट ब्लॉकेज चेक करण्यासाची एक पद्धत म्हणजे पायऱ्यांची टेस्ट. रिसर्चनुसार, जर एक व्यक्ती ९० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात ६० पायऱ्या चढत असेल तर हार्ट हेल्थ चांगली आहे. जर असं होत नसेल तर हार्ट ब्लॉकेजचा धोका असू शकतो.
बोटांनी ब्लॉकेज चेक करा…
आजकाल ही पद्धत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यासाठी रिंग फिंगर आणि लिटिल फिंगरला दुसऱ्या बोटांनी दाबा आणि मिडल फिंगरनं तळहाताला स्पर्श करा. जर यादरम्यान तुमच्या मनगटात वेदना होत असेल तर हार्ट ब्लॉकेजचा धोका असू शकतो.
(सोशल मीडियावरून साभार)
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…