आरोग्य

जंत म्हणजे काय? लहान मुलं झोपेत दात खातात

लहान मुलांना विविध आजारांपासून वाचवण्यासाठी आपण सतत काही ना काही उपाय करत असतो. पायाला भिंगरी असल्यासारखे हे चिल्ले-पिल्ले सगळीकडे धावपळ करतात. मातीत खेळतात. इतरही मस्ती करतच असतात. अर्थात लहान मुलं मस्ती करणारंच. त्यांना आपण थांबवू शकत नाही. चिंता असते ती आजारपणाची. धूळ, माती, प्रदूषण आणि सतत बदलत्या हवामानामुळे रोगराई पसरते. त्याचा प्रथम शिकार ही लहान मुलच होतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असते. मुलांना सर्दी खोकला झाल्यावर तो आपण आपल्या रामबाण औषधांनी बरा करतोच. पण एक आजार आहे, जो मुलांमध्ये सतत उद्भवतो. तो म्हणजे जंत. मुलांना सतत जंतांचा त्रास होतो. अनेकदा त्याची काही लक्षणेही दिसून येत नाहीत. त्यामुळे उपायही वेळीच केले जात नाहीत.

जंत म्हणजे काय

जंत म्हणजे अगदी लहान कृमी असतात.

ज्या आपल्याला दिसतही नाहीत. या कृमी पाण्यामध्ये असतात. जमिनीवर असतात. तसेच अन्नातही असतात. त्याच्यापासून शरीराचा बचाव करणे कठीणच आहे. त्या अनेक मार्गे शरीरामध्ये प्रवेश करतात. त्या पचनसंस्थेवर परिणाम करायला सुरवात करतात. वेळीच उपचार केले नाहीत तर, सर्वच संस्थांवर परिणाम करू शकतात. मातीमधून हे जंत पोटात जातात, त्यामुळे लहान मुलांना त्याचा त्रास जास्त होतो.

जंत झाल्यास लहान मुलांना सतत भूक लागते. काही प्रसंगी भूक लागणंच बंद होतं. जनेंद्रियांमध्ये आग होते. खाज सुटते. मुलांची चिडचिड वाढते. ते सतत अस्वस्थ होतात. वजनही कमी होते. झोपल्यानंतर मुलं दात चावतात.

1) मुलांना गुळाचा खडा खायला देत जा. गूळ औषधी असतो. तसेच मुलं खायलाही नखरे करत नाहीत.

2) ओवा हा पोटाच्या सर्वच विकारांसाठी चांगला आहे. चमचाभर ओवा गरम पाण्याबरोबर खायचा. पोटातील जंत कमी होतात.

3) पोट साफ करण्यासाठी एकदम गुणकारी उपाय म्हणजे एरंडेल तेल. पोटातील घाण बाहेर टाकण्याचे काम हे तेल करते. गरम पाण्यामध्ये साखर घाला. त्या पाण्याबरोबर एरंडेल तेल मुलांना द्या. त्या तेलाची चव वाईट असते, म्हणून साखर वापरायची. या उपायांनी नक्कीच मुलांच्या पोटातील जंत कमी होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

2 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

16 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

16 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

16 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

16 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

16 तास ago